नांदवडे येथील भगवा ग्रुपच्या वतीने आयोजित हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करताना डॉ. सुनिल काणेकर, शेजारी पिणु पाटील, ग्रुपचे सदस्य व इतर. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
नांदवडे (ता. चंदगड) येथील भगवा कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन गेली दोन वर्ष कोरोना रुग्णांना सेवा देणारे डॉ. सुनील काणेकर यांच्या हस्ते झाले. मनसे उप जिल्हाप्रमुख प्रताप उर्फ पिणु पाटील प्रमुख उपस्थित होते. अध्यक्षस्थानी विठोबा गावडे होते.
मान्यवरांचे गुलाबपुष्प देवून स्वागत करताना भगवा ग्रुपचे सदस्य. |
उद्गघाटनानंतर डॉ. सुनिल काणेकर म्हणाले, ``आपला तालुका अन्नधान्याने सशक्त झाला पाहिजे. यासाठी सेंद्रिय शेती काळाची गरज आहे . त्यासाठी सर्वांनी सेंद्रिय शेतीची चळवळ उभी केली पाहिजे. यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी कले.``
मनसे उपजिल्हाप्रमुख पिनु पाटील यांनी ``तरुणांनी राजकारण न पाहता एकत्र येऊन चंदगडच्या पर्यटनासाठी निधी आणला पाहिजे असे मत व्यक्त केले.`` यावेळी दयानंद गावडे, गणपत कांबळे, संपत पेडणेकर, कल्पेश शिंदे, भिवाजी पवार, राजू पाटील, विठ्ठल गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक भगवा ग्रुपचे अध्यक्ष विशाल गावडे यांनी केले. सुनिल शिंदे यांनी सुत्रसंचालन केले. सचिव बाबुराव शिंदे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment