कुदनूर- हंदीगनूर रस्ता : केवळ आश्वासनेच; कामाचा मुहूर्त कधी - चंदगड लाईव्ह न्युज

14 November 2021

कुदनूर- हंदीगनूर रस्ता : केवळ आश्वासनेच; कामाचा मुहूर्त कधी

कुदनूर- हांदिगनूर रस्त्याची पाऊस पडल्यानंतर होणारी अवस्था.


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
 कुदनूर हंदीगनूर या महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांना जोडणाऱ्या रस्त्याची दिवसेंदिवस अधिकच दुरावस्था होत आहे. गेल्या काही वर्षात लोकप्रतिनिधींकडून आश्वासनाशिवाय काहीच मिळालेले नाही. दोन्ही राज्यातील ग्रामस्थांकडून याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
  रस्त्याचे मजबुतीकरण, रुंदीकरण, डांबरीकरण साईडपट्टीसह हाेणे गरजेचे आहे. रस्ता मंजूर असल्याचे सांगून ग्रामस्थांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम गेल्या काही वर्षात सुरू आहे. प्रत्यक्षात रस्ता कामाचा मुहूर्त कधी? असा सवाल ग्रामस्थ वाहनधारक व प्रवासी करत आहेत. एकूण पाच किलोमीटर लांबीच्या रस्त्यापैकी चंदगड तालुका हद्दीत चार किमी तर एक किलोमीटर कर्नाटकातील बेळगाव तालुक्यात आहे. जशी महाराष्ट्र हद्दीत रस्त्याची दुरावस्था झाली आहे तीच स्थिती कर्नाटक हद्दीत देखील आहे. हा रस्ता झाल्यास कुदनूर, कालकुंद्री, नेसरी, राजगोळी परिसराचे बेळगाव शहराशी अंतर पाच ते सहा किलोमीटरने कमी होणार आहे. रस्त्यातील खड्ड्यांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी संबंधित दोन्ही आमदार व बांधकाम विभाग यांनी समन्वयाने तात्काळ हे काम मार्गी लावावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.




No comments:

Post a Comment