अडकूरच्या शिवशक्ती हायस्कूलला निर्भया पथकाची भेट , विद्यार्थिनिना केले मार्गदर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

14 November 2021

अडकूरच्या शिवशक्ती हायस्कूलला निर्भया पथकाची भेट , विद्यार्थिनिना केले मार्गदर्शन

 

निर्भया पथकातील पो . हवालदार तानाजी पाटील , पो .कॉ. धनश्री सावंत , प्राचार्य श्री सुर्यवंशी व विद्यार्थिनि

अडकूर- सी . एल. वृत्तसेवा

अडकूर (ता . चंदगड ) येथील श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेजला गडहिंग्लज उपविभागाच्या निर्भया पथकाने भेट दिली.

      यावेळी पोलिस कॉ . धनश्री सावंत यानी इयत्ता आठवी ते १० वीच्या विद्यार्थिनिंना आत्म संरक्षण कसे करावे ? यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले . यावेळी निर्भया पथकाचे प्रमुख पो . हवालदार तानाजी पाटील , पो .कॉ. मांतेश पाटील , श्री शिवशक्ती हायस्कूलचे प्राचार्य व्ही . एन . सुर्यवंशी ,सर्व शिक्षक व शिक्षकेत्त कर्मचारी उपस्थित होते. स्वागत प्राचार्य श्री सुर्यवंशी यानी केले तर आभार पी.के. पाटील यानी मानले.


No comments:

Post a Comment