बांधकाम असोसिएशन च्या वतीने खेळाडूंना किट वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

14 November 2021

बांधकाम असोसिएशन च्या वतीने खेळाडूंना किट वाटप

तडशिनहाळ (ता. चंदगड) येथे बांधकाम कामगार कल्याणकारी असोसिएशनच्या वतीने तालुक्यातील खेळाडूंना कीट वाटप करताना अध्यक्ष कलाप्पा निवगीरे 


चंदगड / प्रतिनिधी

चंदगड तालुका बांधकाम कामगार कल्याणकारी असोसिएशन च्या वतीने तालुक्यातील खेळाडूंना कीट वाटप अध्यक्ष कलाप्पा निवगीरे यांच्या अध्यक्षतेखालील हस्ते करण्यात आले. संघटनेच्या तडशिनहाळ येथील कार्यालयात संघटनेचे अध्यक्ष श्री. निवगीरे व सदस्य  यांच्या वतीने खेळाडूंना कीट वाटप करण्यात आले. या वेळी अध्यक्ष  निवगीरे म्हणाले सध्या प्रत्येक गावात कबड्डी, क्रीकेट या सारखे खेळ खेळवण्यात येत आहेत,ग्रामीण भागातील

 खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ह्या कीट चे वाटप करण्यात आले.यावेळी उपाध्यक्ष बाबू चौगले, सचिव मोहन चौगले, खजिनदार उमाजी पवार, सट्टूपा सुतार, बाळू कडोलकर, अवधूत भुजबळ, शिवाजी पाटील, विभाग प्रमुख मोनश्री चव्हाण, मारूती पाथरूट, रघुनाथ पाटील, सुरेश चिंचणगी सह कामगार व खेळाडू उपस्थित होते आभार सट्टूपा सुतार यानी मानले.


No comments:

Post a Comment