कुदनूर येथे उज्ज्वला योजनेअंतर्गत सिलेंडर व शेगडी वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

14 November 2021

कुदनूर येथे उज्ज्वला योजनेअंतर्गत सिलेंडर व शेगडी वाटप

कुदनूर येथे उज्वला गॅस सिलेंडर संच चे वाटप करताना मान्यवर

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कुदनूर ता. चंदगड येथे दहा लाभार्थ्यांना उज्वला योजनेंतर्गत गॅस सिलेंडर व शेगडी वाटप करण्यात आले.
  डॉ.संदेश जाधव (सरचिटणीस ,भाजप युवा मोर्चा चंदगड) यांच्या प्रयत्नातून गरजूंना लाभ देण्यात आला. ऐन दिवाळीत जनतेची चुल पेटवणे म्हणजेच समाजकारण असे प्रतिपादन डॉ.संदेश जाधव यांनी यावेळी केले. त्यांना या कामी माजी रोहयोमंत्री भरमूअण्णा पाटील व भाजप माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. गॅस वाटप प्रसंगी संदेश जाधव यांच्यासह शशिकांत सुतार, बाबुराव जाधव, विजय आंबेवाडकर, सागर नागरळेकर, जिवबा जाधव आदींसह ग्रामस्थ व लाभार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment