चंदगड ते चंदगड फाटा रस्ता वाहतुकीला बंद, वाचा काय आहे कारण... - चंदगड लाईव्ह न्युज

14 November 2021

चंदगड ते चंदगड फाटा रस्ता वाहतुकीला बंद, वाचा काय आहे कारण...

चंदगड ते चंदगड फाटा दरम्यान मदरसाजवळील जुन्या मोरीची खचलेली भिंत.

 चंदगड / प्रतिनिधी

चंदगड ते चंदगड फाट्या दरम्यान मदरसाजवळील जुन्या मोरीची भिंत खचल्याने या मार्गावरील चंदगडला येणारी वहातूक थांबवण्यात आली आहे. चंदगडला जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्यात येत आहे. सध्या चंदगड शहरात जाण्यासाठी सर्व वाहनांनी हिंडगाव फाटा,किंवा झरेबांबर  या पर्यायी रस्ताचा वापर करावा असे आवाहन चंदगड बांधकाम विभागाकडून करण्यात आले आहे.  मदरसाजवळील मोरीची भिंत व रस्ता दुरुस्त होईपर्यत प्रवाश्यांना पर्यायी मार्गाने चंदगड शहरात प्रवेश करावा लागणार आहे.No comments:

Post a Comment