चंदगड अर्बन बँकेचे चेअरमन दयानंद काणेकर |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड अर्बन बँकेच्या वतीने आयोजित केलेल्या चंदगड अर्बन चषक स्पर्धेचे आयोजन रविवारी (ता. ७) पासून करण्यात आल्याची माहिती बँकेचे चेअरमन दयानंद काणेकर यांनी दिली.
चंदगड अर्बन बँकेच्या वतीने चंदगड अर्बन चषक (सी. पी. एल.) या भव्य फुल पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रिंडागणात या स्पर्धा होतील.
स्पर्धेमध्ये मर्यादित ३२ संघांना प्रवेश दिला जाणार असून १० षटकांचा एक सामाना होईल. स्पर्धेसाठी ५०००/- रुपये प्रवेश फी आहे. विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी ७१,०००/- (दयानंद काणेकर व मारुती कुंभार यांच्याकडून) द्वीतीय क्रमांकासाठी ४१,०००/- (प्रमोद कांबळे यांच्याकडून), तृतीय क्रमांकासाठी २१,०००/- वैजाप्पा शिवलिंगाप्पा वाली यांच्याकडुन) तर चतुर्थ क्रमांकासाठी ११,०००/- (फिरोज अब्दुलरशिद मुल्ला यांच्याकडून) बक्षिस ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजसाठी ३००१ (अभिजित शांताराम गुरबे यांच्याकडून), मॅन ऑफ द मॅचसाठी ३००१ (बाबू बाळा हळणदकर यांच्याकडून), उत्कृष्ट फलंदाजसाठी ३००१ व उत्कृष्ट गोलंदाजसाठी ३००१ (मंडळाकडून) रुपयांचे बक्षिस ठेवण्यात आले आहे. इच्छुकांनी अधिक माहीतीसाठी 9421287807, 9421187868, 9923677874 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment