'बारी' कादंबरीवरील 'सबूद' नाटकासाठी कलाकारांचा शोध, १४ नोव्हेंबरला डोंबिवलीत होणार निवड - चंदगड लाईव्ह न्युज

05 November 2021

'बारी' कादंबरीवरील 'सबूद' नाटकासाठी कलाकारांचा शोध, १४ नोव्हेंबरला डोंबिवलीत होणार निवड

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

         स्वामीकार, पद्मश्री रणजित देसाई यांच्या 'बारी' कादंबरीवर आधारित 'सबूद' महानाट्यासाठी कलाकारांची निवड १४ नोव्हेंबर रोजी दुपारी ११ ते ३ या वेळेत डोंबिवली येथे होणार आहे.

        स्वामी विवेकानंद विद्यामंदिर (राणा प्रताप), विष्णुनगर, दिनदयाळ रोड, डोंबिवली (पश्चिम) येथे होणाऱ्या ऑडिशन्स साठी कलाकार चंदगड तालुक्यातील स्थानिक व मुंबई शहर, उपनगरातील रहिवासी असणे बंधनकारक आहे. यावेळी नाटकातील स्त्री, पुरुष कलाकार व एक स्त्री लावणी नृत्यांगना यांची निवड केली जाणार आहे. तरी इच्छुक कलाकारांनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन 'नाट्यसंस्कार' च्या वतीने निर्माता शिवाजी विष्णू पाटील व संजय पाटील, दिग्दर्शक जीवन कुंभार आदींनी केले आहे. 

        'बारी' कादंबरीवरून 'सबूद' या दोन अंकी नाटकाचे लेखन सन्ना मोरे यांनी केले आहे. या नाट्यरूपांतरास रणजीत देसाईंच्या कन्या पारू नाईक, मधूमती शिंदे, नातू गौरव नाईक व कुटुंबियांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

         इच्छुक कलाकारांनी (शिवाजी पाटील 9167066455) या व्हाट्सअप क्रमांकावर १३ नोव्हेंबर पर्यंत आपली नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment