नावगे मॅराथॉन स्पर्धेत कालकुंद्रीचा सुमित पाटील प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

05 November 2021

नावगे मॅराथॉन स्पर्धेत कालकुंद्रीचा सुमित पाटील प्रथम

नावगे येथे प्रथम क्रमांकाचे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते स्वीकारताना सुमित पाटील.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

             कर्नाटक मधील नावगे (ता. खानापूर) येथे नुकत्याच झालेल्या मॅराथॉन स्पर्धेत पंधरा वर्षाखालील मुलांच्या गटात कालकुंद्री (ता. चंदगड)
येथील धावपटू सुमित बंडू पाटील याने प्रथम क्रमांक पटकावला. त्याला रोख रक्कम, गौरव चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्याने यापूर्वी गडहिंग्लज, बागलकोट, सांगली आदी ठिकाणच्या मॅराथॉन स्पर्धेत अभिनंदनीय यश संपादन केले आहे‌ त्याला याकामी आई, वडील, कुटुंबीय, मित्रमंडळ यांचे प्रोत्साहन तर श्री सरस्वती विद्यालय कालकुंद्री मधील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

                                         

No comments:

Post a Comment