जेलूगडेत टस्कराने केले बैलगाडीचे दोन तुकडे, या टस्कराला आवर कोण घालणार? - चंदगड लाईव्ह न्युज

25 November 2021

जेलूगडेत टस्कराने केले बैलगाडीचे दोन तुकडे, या टस्कराला आवर कोण घालणार?

टस्कराने उध्वस्थ केलेली बैलगाडी

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        गेल्या दोन दिवसात चंदगड तालूक्यात हत्तीचा धूमाकूळ चालू आहे. जेलुगडे येथे या टस्कराने गावडू बडकू गावडे यांच्या परसात लावलेल्या बैलगाडीचे दोन तुकडे करून टाकले. तर दोन दिवसा पूर्वी मळवी येथे  ट्रॅक्टर ट्रॉली याच टस्कराने पलटी केली होती.

       सन २००३ पासून हत्तीकडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. चंदगड तालुक्यातील जेलूगडे येथे टस्करणे धुमाकूळ घातला आहे. जेलुगडे गावात या टस्कराने पिकांच्या नुकसानीबरोबच, बैलगाडी, शेती अवजारे तसेच इतर साहित्याची मोडतोड करून मोठे नुकसान केले आहे. जेलुगडे, पाटणे, शेवाळे, कालानंदीगड या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा वन विभागाकडून  देण्यात आला आहे.

         जेलुगडे परिसरात गेल्या दोन दिवसापासून हत्तींचा कळप वावरत असून त्यातील टस्करने येथील शेतीवाडीचे, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. सध्या ऐन सुगीच्या हंगामात भात, ऊस पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामध्ये एका बाजूला अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेली पिके हातची जाण्याची भीती निर्माण झालेली असताना टस्करकडून झालेल्या नुकसानीचे या भागातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. काल रात्री दीड वाजण्याच्या सुमारास जेलुगडे येथे गावडू बडकू गावडे यांच्या परसात टस्कर आल्याची माहिती मिळाली. दरम्यान, टस्करने  तेथे ठेवलेल्या बैलगाडीचे दोन तुकडे केले.टस्कर तेवढ्यावरच थांबला नाही. या टस्कराने शेतकऱ्यांचे ऊस, भात, नाचण्याचे देखील खूप नूकसान केले आहे. जेलुगडे, पाटणे, शेवाळे, कालानंदीगड या गावातील लोकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला असून शेतात रात्री किंवा दिवसा दुपारी देखील जाताना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. पण सुगी कशी करायची? याचा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. वनविभागाने या हत्तींचा तात्काळ बंदोबस्त करून नुकसान केलेल्या शेतीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment