म्हाळुंगे कारखान्याजवळ रस्ता दुरुस्त करून वाहनांचा अडथळा दूर करा - चंदगड लाईव्ह न्युज

25 November 2021

म्हाळुंगे कारखान्याजवळ रस्ता दुरुस्त करून वाहनांचा अडथळा दूर करा

तहसिलदार यांना निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते अनंत अर्जून गावडे व इतर.



चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          कोलिक-म्हाळुंगे रस्त्यावरील खा. म्हाळुंगे या ठिकाणी असलेल्या इको-केन शुगर्स (नलवडे शुगर्स)या साखर कारखान्याला ऊस पुरवठा करण्यार्या वाहतुकीमुळे हा रस्ता नादुरुस्त झाला असून वाहनांच्या अडथळ्याचा नाहक त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. या प्रश्नाकडे कारखाना प्रशासन दुर्लक्ष करत असून हा रस्ता तातडीने दुरुस्त व्हावा अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अनंत अर्जून गावडे यांनी दिला आहे. याबाबत तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.

          निवेदनात म्हटले आहे की, इको केन साखर कारखान्याकडे जाणारा रस्ता हा अवजड वाहतुकीमुळे नादुरुस्त झाला असून त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. हा रस्ता दुरुस्त व्हावा या दृष्टिकोनातून कारखाना प्रशासनाला वेळोवेळी तोंडी तसेच निवेदनाद्वारे रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात आली असून त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. या रस्त्यावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण देखिल वाढले असून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासन डोळेझाक करत आहे. त्यामुळे या प्रश्‍नामध्ये गांभीर्याने लक्ष घालून येत्या आठ दिवसात रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा अन्यथा आपण चंदगड तहसील कार्यालय येथे आत्मदहन करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अनंता अर्जुन गावडे यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन आज तहसिलदार यांना देण्यात आले.

No comments:

Post a Comment