🔴साप्ताहिक राशीभविष्य🔴 गुरुवार दि.२५ नोव्हेंबर ते बुधवार दि.१ डिसेंबर २०२१, वाचा कसा असेल येणारा आठवडा........... - चंदगड लाईव्ह न्युज

25 November 2021

🔴साप्ताहिक राशीभविष्य🔴 गुरुवार दि.२५ नोव्हेंबर ते बुधवार दि.१ डिसेंबर २०२१, वाचा कसा असेल येणारा आठवडा...........

 🔴साप्ताहिक राशीभविष्य🔴 

गुरुवार दि.२५ नोव्हेंबर ते बुधवार दि.१ डिसेंबर २०२१


मेष-

मन विचलीत करणाऱ्या घटना घडतील आणि आपण खिन्न व्हाल.निर्णयक्षमता ढासळेल.पण आळस झटकून कामाला लागा.गुरु महाराजांची कृपा आपणांस सर्व संकटांतून तारुन नेईल.आर्थिक ओढाताण होईल पण अचानक धनलाभाचे योगही दिसत आहेत.तब्येतीकडे लक्ष द्यावे लागेल.सप्ताहाच्या अखेरीस पून्हा आपण नव्या जोमाने कार्यरत व्हाल.मातेला वैद्यकीय तपासणी साठी न्यावे लागेल.आध्यात्मिक उपासना फलदायी होईल.


वृषभ-

आठवड्याच्या सुरुवातीला वैद्यकीय बाबींवर खर्च होणार आहे.मनोधैर्य खचून जाऊ देऊ नका.अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे.मित्र आणि नातेवाईक यांची मदत मिळेल.संतती कडून चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील.हातून गेलेले काम पून्हा मिळेल आणि आपण सुखाऊन जाल.पती-पत्नीत किरकोळ कारणासाठी खटके उडण्याची शक्यता आहे. शब्द जपून वापरा.आध्यात्मिक प्रगती होईल.


मिथुन-

रागावर नियंत्रण ठेवावेच लागेल नाहीतर हाता तोंडाशी आलेला घास निसटून जाण्याची शक्यता आहे.अनैतिक संबंध चवाठ्यावर येऊन आपल्या इभ्रतीला धक्का लागू शकतो.सावध रहा.आध्यात्मिक मार्गावर असणाऱ्यांना गुरुभेटीचा आनंद मिळून जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटेल.लाभात हानी होईल.अचानक खर्चात वाढ होईल.जपून खर्च करा.प्रेमासाठी समोरून होकार मिळेल आणि आपणांस आभाळ ठेगणे झाल्यासारखे वाटेल.


कर्क- 

सद्य स्थितीत हातातील असलेल्या कामाशी प्रामाणिक राहुनच काम करा.अन्यथा हात चोळत बसण्याची वेळ येऊ शकते.वाहन चालवताना काळजी घ्या नाहीतर रुग्णालयात भरती होऊ शकाल.सावध रहावे. प्रेमात जबरदस्ती करुन नुकसानच होईल हे पक्के लक्षात ठेवा.मातेकडून लाभ होण्याची शक्यता आहे.पति-पत्नीत खटके उडतील आणि जोडिदार टोकाची भूमिका घेईल.वादविवाद टाळा.एकमेकांना समजून घेऊन पूढे चला.


सिंह-

कोर्ट-कचेरीच्या कामात विलंब होईल.घटस्फोटांच्या प्रकरणात सामनेवाला वेगळेच मुद्दे उपस्थित करुन खटल्याला वेगळे वळण देण्याचे प्रयत्न करेल.कामाचा योग्य मोबदला मिळेल.आर्थिक लाभ चांगले होतील परंतु आठवड्याच्या अखेरीस खर्चातही वाढ झाल्याने आपण थोडे अस्वस्थ व्हाल.तशातच मित्र,नातेवाईक किंवा अन्य कोणाला आपल्या उदारपणाचे कौतुक व्हावे म्हणून आर्थिक मदत करण्याचे टाळा.सहकाऱ्यांशी सलोखा ठेवा.प्रेमासाठी वाट्टेल ते करुन खर्च वाढवू नका.या आठवड्यात थोडे संयमाने वागण्याची आवश्यकता आहे.


कन्या-

हा आठवडा आपणांस आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाणारा आहे.नामसाधनेत खंड पडू देऊ नका.सासुरवाडी कडून काही वार्ता अचानक येण्याची शक्यता आहे.विवाहेच्छुंचे विवाह ठरतील.प्रेमात सफालता मिळेल.बढती,बदली चे योग संभवतात.काही लोकांच्या नोकरीत बदल होतील.क्वचित प्रसंगी पदवनती होण्याचे योग संभवतात,जपून रहा.मित्र फसवतील.जोडिदार रागाने भांडून घर सोडून जाण्याची शक्यता.आपण सामोपचाराने वागण्याचा प्रयत्न करा.तेच योग्य राहील.आर्थिक आवक बरी राहील.


तुळ-

जोडिदाराच्या विक्षिप्त वागण्यामुळे आपण निराशेच्या गर्तेत जाऊ शकता.स्वतःला सांभाळा.सासुरवाडी वरुन पाहुणे येतील.आपल्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न होईल.आपण खंबीर राहिल्यास योग्य मार्ग काढाल.आठवड्याच्या अखेरीस आपणांस उत्तम लाभ होऊ शकतात.प्रयत्न मात्र करावे लागतील.शैक्षणिक लाभ मिळतील.ज्यांच्या कार्याचे किंवा अभ्यासाचे मूल्यमापन या आठवड्यात होणार आहे अशा लोकांनी सावध रहा.आपण केलेल्या चूका महाग ठरतील.प्रेमाने भाग्य उजळेल.


वृश्चिक-

या आठवड्यात शांत राहून आध्यात्मिक उपासना वाढवा. डोक्यात नाहीनाही ते विचार थैमान   घालतील.अचानक एखाद्या अनपेक्षित व्यक्ती कडून आपणांस विवाहासाठी विचारणा होईल.अशावेळी रागावर नियंत्रण ठेवा.मातेला आरोग्याचे दृष्टीने जपावे लागेल.ठरलेल्या विवाहात अडचणी उद्भवतील.तारिख पूढे ढकलावी लागेल.पण आठवड्याच्या अखेरीस आपली सर्व कमी भरुन निघेल आणि आपले मन शांत होईल.


धनु-

गर्भवती स्त्रीयांनी या आठवड्यात स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणे आणि योग्य आहार,नियमित व्यायाम व डॉक्टरांनी दिलेला सल्ला काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे.अन्यथा अनिष्ट घटना संभवतात.कौटुंबिक धन खर्च होण्याची शक्यता.तब्येतीकडे सर्वांनी विशेषतः लक्ष देणे आवश्यक आहे.हृदय,मेंदू तसेच शुक्र विकार त्रास देतील.खर्च भरपूर होईल.घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला मानून पूढे जावे.आध्यात्मिक बल वाढवा.योगा करा.


मकर-

आपल्या अंगी असणाऱ्या आळसाला दूर करुन कामाला लागा.वाडवडिलांची पुण्याई कामी येईल.मातेच्या तब्येतीकडे लक्ष द्या.प्रेमात आपण जोडिदाराला कोणत्याही प्रकारे जबरदस्तीने आपले मानायला लावू नका.त्याचे परिणाम नंतर तुंम्हालाच भोगावे लागतील.मित्र,नातेवाईक व धाकटया भावंडांकडून आर्थिक सहाय्य मिळेल.पण कौटुंबिक धन खर्च होण्याचे योग दिसतात.आरोग्याचे दृष्टीने काळजी घ्या.वाहन चालवताना नियमांचे पालन करा.जोडिदाराची साथ लाभेल.


कुंभ-

कोणत्याही कामात स्वतःच्या निर्णयावर शेवटपर्यंत ठाम रहा तरच कार्य पूर्णत्वाला जातील. या सप्ताहात कोणालाही उधार-उसनवार देण्याच्या भानगडीत पडू नका.जमीन,जागा,वास्तू संदर्भातील कामे मार्गी लागतील.संतती कडून आनंददायी बातमी ऐकायला मिळेल.भाग्याची अखंड साथ मिळेल.जोडिदार प्रेमाचा वर्षाव करेल.आर्थिक आवक उत्तम राहील. नवीन योजनांची आखणी कराल.


मीन-

खूप दिवसांपासून सुरू असलेले खर्च आटोक्यात येतील.आध्यात्मिक प्रगती उत्तम होईल.गुरुभेटीचा आनंद मिळेल.गुरुमंत्र मिळेल.स्थावर जंगम मालमत्ते संदर्भात सहहिस्सेदार वाटणी मागतील.फसवणूक झाल्यामुळे आपणांस मानसिक त्रास जाणवेल.आईच्या तब्येतीकडे लक्ष द्या.नवीन जागा,वास्तू खरेदीच्या योजना आखाल.संततीच्या गैर कृत्यामुळे आपणांस मान खाली घालावी लागेल.लाभ उशीराने होतील.


                                      ।।शुभं भवतु।।

                   ज्योतिर्विद्या वाचस्पती डॉ.प्रसन्न मुळ्ये.

                     वैयक्तिक सल्ला व मार्गदर्शनासाठी-

            ९४०५९५४७२९(व्हॉट्सॲप), ९४०५३३४५५३(कॉलिंग)

No comments:

Post a Comment