जागतिक संकटातही चंदगड तालुका संघाची घोडदौड, उद्या वार्षिक सर्वसाधारण सभा - आमदार राजेश पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

25 November 2021

जागतिक संकटातही चंदगड तालुका संघाची घोडदौड, उद्या वार्षिक सर्वसाधारण सभा - आमदार राजेश पाटील

चेअरमन राजेश पाटील

चंदगड / नंदकुमार ढेरे

          चंदगड तालुका हा कोल्हापूर जिल्हयाच्या शेवटच्या टोकाला असून, मागासलेला भाग म्हणून ओळख असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांची उन्नती व्हावी व सावकारी पाशातून त्यांची सुटका व्हावी या हेतूने दिनांक २८-१२-१९ ५ ९ या साली चंदगड तालुका शेतकरी सह.ख.वि.संघ लि. तुर्केवाडी या नांवाने संघाची स्थापना झाली असून आज ६२ वर्षे पूर्ण होत आहेत. 

          चंदगड तालुक्याचे भाग्य विधाते माजी आमदार कै. नरसिंगराव गुरुनाथ पाटील यांची प्रेरणा व आशिर्वाद घेऊन त्यानी दाखवून दिलेल्या मार्गदर्शनाखाली संघाच्या कारभाराची वाटचाल सूरू आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली सन १ ९ ७८ साली दौलत डिझेल पंप हलकर्णी या नांवाने हलकर्णी फाटा येथे पेट्रोल पंपाची स्थापणा करणेत आली त्यानंतर २००१ साली शिनोळी बु. येथे संस्थेचा गायछाप दाणेदार मिश्रखत कारखाना चालू करणेत आला त्यानंतर सन २०१२-१३ सालापासून तुलसी बझार या नांवाने संघाच्या प्रत्येक शाखेत मिनी मॉल चालू करणेत आले आणि आज तागायत ते प्रत्येक शाखेत कार्यरत करणेत आले आहेत आणि तेंव्हापासून संघाची खऱ्या अर्थाने घोडदौड चालू झाली आहे. संघाकडून संघाचे सर्व सभासद व ग्राहक यांना खते , खाद्यतेले , डिझेल - पेट्रोल, जिवनोपयोगी माल, बियाणे, किटक नाशके, पशुखाद्य, सिमेंट व रेशनमालाचा पुरवठा योग्य दरांत, योग्य वजनांत व योग्य प्रतिचा माल पुरवठा केला जातो. 

          संस्थेने उत्पादीत केलेल्या मालाची क्वालीटी खात्री प्रत्यक्ष शेतावर जावून केली जाते. शेतकऱ्यांच्या त्याबाबत व तुलसी बझारमधिल माला बाबत काही शंका असलेस त्यांची दखल घेऊन ज्यात्या ठिकाणी शाखा पातळीवर ठिक ठिकाणी सभासद व ग्राहक मेळावे घेवून ग्राहकांचे शंकाचे निरसन केले जाते त्यामुळे संघाचे व्यवहार वाढणेस फार मोठी मदत होत असते. संघाने उत्पादीत केलेल्या मालाचा दर्जा, वजन व त्याचे योग्य दर याबाबत संस्थेच्या सर्व सभासद व ग्राहक यांचा विश्वास वाढलेने व्यवहारात फार मोठी वाढ होऊन ती सन २०१२-१३ मध्ये रुपये ३ ९ ६६.२३ लाखाची उलाढाल होती. 

          ती २०२०-२१ मध्ये रुपये ७२४८.५२ लाखापर्यंत वाढलेली आहे त्यामुळे संस्थेच्या निव्वळ नफयात वाढ होऊन पर्यायाने स्वभांडवलात वाढ झालेली आहे. त्याची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. अ. नं. तपशिल 9 २ ३ ४ ५ ६ ७ ८ शे . भांडवल रिझर्व्ह व इतर फंड ठेवी गुंतवणूक बँक कर्जे वार्षिक उलाढाल निव्वळ नफा नक्त मुल्य (स्वभांडवल) 

सदरची आकडेवारी पहाता संस्थेने भागभांडवल, रिझर्व्ह व इतर फंड, ठेवी, गुंतवणूक वार्षिक उलाढाल व नफा यात दुपटीने व अधिक वाढ झालेली असून, बँकेच्या कर्जात मात्र घट झालेचे दिसून येते यावरुन संस्थेच्या प्रगतीची वाटचाल आपले लक्षात येईल संस्थेचे नक्त मुल्य (स्व. भांडवल) सन २०१२-१३ मध्ये रुपये ४७०.६४ होते. 

         त्यात वाढ होऊन सन २०२०-२१ मध्ये रुपये ९ ३ ९ .८४ इतके होऊन त्यात ४६ ९ .२० ने वाढ झालेली आहे. यावरुन संस्थेचे स्व भांडवलात वाढ होत असले बाबत आपले लक्षात येईल. संस्थेने सन २०१६-१७ सालांत हलकर्णी फाटा येथे प्रशस्त अशी इमारत बांधून त्यामध्ये तुलसी बझार चालू केला आहे. शाखा हेरे येथे स्वताची इमारत खरेदी केलेली आहे व त्यामध्ये तुलसी बझार चालू केलेला आहे. संस्थेची प्रगती व वरील सर्व बाबी लक्षांत घेता याची दखल महाराष्ट्र राज्य शासन पातळीवर घेतली असून सन २०१६-१७ सालाचा सहकार भूषण व अटल महापणन हे दोन पुरस्कार देवून संघास महाराष्ट्र शासना कडून गौरविण्यात आलेले आहे ही बाब संस्थेच्या दृष्टीने भूषणावह ठरलेली आहे. 

            यामध्ये संस्थेच्या नोकर वर्गाचे व संस्थेच्या सर्व सभासदांचे फार मोठे योगदान असून संस्थेच्या कामगारांनी दिलेले योगदान, वाढती महागाई लक्षांत घेऊन संस्थेच्या कर्मचाऱ्यांना सातत्याने पगार वाढ, बोनस व बक्षिस देवून त्यांना समाधानी ठेवणेचा प्रयत्न केलेला आहे तसेच सभासदांनी दिलेले योगदान लक्षांत घेवून दरवर्षी नागपंचमी, गणेश चतुर्थी, दसरा, दिपावली या सनानिमित्त खरेदीच्या प्रमाणांत मोफत साखर दिली जाते. 

           तसेच दरवर्षी लाभांश रुपाने सवलतीचे दरांत तिन किलो येशेल दिलेले आहे. नजिकच्या काळांत शाखा तुर्केवाडी व तुडीये येथे संस्थेच्या मालकीच्या भव्य अशा इमारती बांधून त्यामध्ये तुलसी बझार चालू करणेचे काम चालू आहे. संस्थेचे कार्यक्षेत्र चंदगड तालुका होते ते वाढवून घेऊन कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्र करवून घेवून नेसरी, तालुका गडहिंग्लज येथे पहीली शाखा चालू केलेली आहे. कोरोना काळात अडचणी निर्माण झालेने पुढील शाखा चालू करणेचे काम थांबले होते ते नजिकच्या काळात चालू करणेचे प्रयत्न चालू आहेत. जवळच कर्नाटक व गोवा राज्य लागूण असलेमुळे त्या भांगातील लोकांची सुध्दा खते व तुलसी बझार चालू करणे बाबत मागणी होत आहे. त्याची दखल घेऊन संस्थेचे मल्टीस्टेट मध्ये रुपांतर करून बेळगांव तालुका व गोवा राज्यामध्ये सीमाभागांत शाखा चालू करुन तेथील सभासद व शेतकऱ्यांची सोय करणेबाबत प्रयत्न चालू आहेत. 

        सन २०२०-२१ सालांत कोरोणा महामारीमुळे जागतीक संकट असतांनासुध्दा संस्थेने मागील सालांत रुपये ६८.०० कोठीची उलाढाल केली होती. ती चालू सन २०२०-२१ मध्ये ७२.५० कोटीपर्यंत वाढवून नफयातही वाढ केलेली आहे. अशाच प्रकारे संस्थेचे व्यवहार वाढवून, संस्था इथुनपुढे अजूनही प्रगतीपथावर नेणेस सर्व सभासदांनी व ग्राहकांनी सहकार्य करावे अशी विनंती करुन, दिनांक २७-११ २०२१ रोजी होणाऱ्या संघाच्या ६२ व्या वार्षिक सर्व साधारण सभेस सर्व सभासदांनी :https://us02web.zoom.us/j/89163936388pwd=MVEzc3h4S2czcHk1YnBHcVFDOIZdz09 पासकोड : 123456 मिटींग आयडी : 89163936388  या लिंकवर उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन आमदार राजेश पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment