स्वखर्चाने राज्यातील पोलीस पाटलांचे प्रबोधन करणारा अवलिया : तानाजी कुरळे - चंदगड लाईव्ह न्युज

13 November 2021

स्वखर्चाने राज्यातील पोलीस पाटलांचे प्रबोधन करणारा अवलिया : तानाजी कुरळे

पुणे जिल्ह्यातील प्रबोधनानंतर पुणे जिल्हा ग्रामीणचे अधिक्षक डाॅ.अभिनव देशमुख यांच्यासोबत तानाजी कुरळे


गडहिंग्लज : सी. एल. वृत्तसेवा

         राज्यातील पोलीस पाटलांना मार्गदर्शन करण्याचा उपक्रम चन्नेकुपी, (ता. गडहिंग्लज) येथील पोलीस पाटील तानाजी रामचंद्र कुरळे यांनी सुरू केला आहे. कुरळे यांचा हा प्रेरणादायी उपक्रम गेली चार पाच वर्षांपासून सुरू आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आदी जिल्ह्यातील प्रबोधनानंतर कोरोनामुळे  यात खंड पडला. तथापि कोरोना कमी होताच पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात प्रबोधन पूर्ण केले.

             लोकराजा राजर्षी शाहूंनी खेड्यातील जनतेला महसुलाचे स्वरूप माहिती व्हावे. यासाठी १९११ व १९१८ मध्ये अनुक्रमे 'पाटील' व 'तलाठी' यांच्यासाठी प्रबोधन वर्ग सुरू केले होते. या ऐतिहासिक घटनेतून प्रेरणा घेत कुरळे राज्यातील सर्व पोलिस पाटीलांना कर्तव्याबाबत साक्षर करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. विशेष म्हणजे आत्तापर्यंतचे सर्व कार्यक्रम त्यांनी स्वखर्चाने फिरून विनामानधन केले आहेत. त्यांना या कामी संबंधित विभागातील पोलिस प्रशासनाचे सहकार्य लाभले. यानंतर त्यांनी कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांमधील पोलीस पाटलांचे प्रबोधन करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. खरेतर अशा आगळ्यावेगळ्या समाजप्रबोधनासाठी संबंधित विभागाकडून प्रवास खर्च स्वरूपात मानधन मिळण्याची गरज आहे. प्रबोधन व्यतिरिक्त त्यांचा 'पोलीस पाटील' या नावाचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला असून त्यांना काव्य लेखनाची सुद्धा आवड आहे.

             नुकत्याच पुणे जिल्ह्यातील प्रबोधन कार्यक्रम प्रसंगी पोलीस उपाधीक्षक अभिनव देशमुख, पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, मा. शा. पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, गडहिंग्लजचे पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांचे सहकार्य तर प्राचार्य साताप्पा कांबळे, प्रा. प्रकाश भोईटे, ज्ञानराज चिघळीकर, गणपतराव पाटोळे, प्रथा सुरेश वडराळे, प्राचार्य सुरेश चव्हाण, बाळासाहेब मुल्ला, जे. बी. बारदेस्कर यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment