माणगाव (ता. चंदगड) येथे रविवार दि.१४ नोव्हेंबर रोजी खुल्या संगीत भजन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी ११००१, ९००१, ७००१, ५००१, ४००१, ३००१, २००१, १००१ अशी अनुक्रमे बक्षिसे आहेत. स्पर्धा सर्वांसाठी खुल्या असतील. स्पर्धेसाठी १२ मिनिटाचा वेळ राहील. दिलेल्या वेळेमध्ये १ अभंग व १ गवळण सादर करणे गरजेचे आहे. अभंग, गवळण गाथ्यातील असावी. भजनी मंडळामध्ये ८ ते ११ जणांचा सहभाग असावा. कमीतकमी दोघांनी गायन करणे गरजेचे आहे. एक व्यक्ती एकाच मंडळातून सहभाग घेऊ शकतो. अखेरचा निर्णय मंडळाचा मानला जाईल. स्पर्धकांनी आपला प्रवेश शनिवार दि. १३ नोव्हेंबरपूर्वी निश्चित करावा. स्पर्धकांनी साहित्य स्वत: चे आणावे. इतर नियम व अटी स्पर्धेच्या ठिकाणी सांगण्यात येतील. भजनी मंडळांनी आपली नावे परशराम बेनके यांच्याकडे नोंदवावीत, असे आवाहन मंडळामार्फत करण्यात आले आहे.
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
No comments:
Post a Comment