चंदगड'मध्ये विशेष मोहिमेत मतदार नोंदणीचा उत्साह, वाचा कधीपर्यंत करु शकता नोंदणी....... - चंदगड लाईव्ह न्युज

13 November 2021

चंदगड'मध्ये विशेष मोहिमेत मतदार नोंदणीचा उत्साह, वाचा कधीपर्यंत करु शकता नोंदणी.......

चंदगड'मध्ये विशेष मोहिमेत मतदार नोंदणी करताना नोंदणी अधिकारी.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

           महाराष्ट्र निवडणूक विभाग मार्फत सुरू असलेल्या मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत मतदार नोंदणी विशेष मोहिमेस चंदगड तालुक्यातील नव मतदारांनी मोठा प्रतिसाद दिला. 

         १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. या अंतर्गत दिनांक १३ व १४ नोव्हेंबर तसेच  २७ व २८ नोव्हेंबर शनिवार रविवार हे चार दिवस विशेष मोहीम मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. या काळात नोंद झालेल्या मतदारांना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीत मतदान करता येणार असल्यामुळे सर्वत्र मतदार नोंदणी चा उत्साह पहायला मिळत आहे. चंदगड तालुक्यात १९८ मतदान केंद्रांवर नोंदणीचे काम सुरू आहे. यासाठी चंदगड- गडहिंग्लज उपविभागाचे प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे व  चंदगड तहसीलदार विनोद रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली १९८ बी एल ओ (केंद्रस्तरीय अधिकारी) व २० पर्यवेक्षक कार्यरत आहेत.

         या कार्यक्रमांतर्गत १ नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून त्यावरील दावे हरकती स्विकारण्याचा कालावधी १ ते ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत आहे. दावे निकाली काढण्याचा दिनांक २० डिसेंबर असून मतदार यादी अंतिम स्वरूपात ५ जानेवारी २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी विनोद रणवरे यांनी दिली आहे.



No comments:

Post a Comment