गावागावात मतदार नोंदणीसाठी १६ रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

13 November 2021

गावागावात मतदार नोंदणीसाठी १६ रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         मतदार जनजागृती अभियानांतर्गत १/१/२०२२ रोजी १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवक-युवतींची नावे मतदार यादीत करण्यासाठी राज्यव्यापी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विनोद रणावरे यांनी दिली.

          निवडणुक आयोगाकडून विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमातंर्गत मतदार यादीतील पडताळणी व दुरूस्ती करून ती त्रुटी विरहित करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.यासाठी या राज्यात मंगळवार दि.१६/११/२०२१ रोजी या विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रामसभेत मतदार यादीचे वाचन करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या ग्रामसभेला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन तहसीलदार विनोद रणवरे यांनी केले आहे. No comments:

Post a Comment