डॉ. विलासराव नांदवडेकर यांचेकडून नेसरी वाचन मंदिरास सदिच्छा भेट - चंदगड लाईव्ह न्युज

07 November 2021

डॉ. विलासराव नांदवडेकर यांचेकडून नेसरी वाचन मंदिरास सदिच्छा भेट

शिवाजी विद्यापिठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर व मान्यवर


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        दिवाळी पाडव्याचे औचीत्य साधून शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलासराव नांदवडेकर यांनी नेसरी वाचन मंदिरास सदिच्छा भेट दिली.                 यावेळी ग्रंथालयाच्या कामकाजाची प्रशंसा केली. तसेच नियोजित 'शहीद मेजर सत्यजित अजितसिंह शिंदे (नेसरीकर) स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या कामकाजा संबंधाने मार्गदर्शक सूचना दिल्या.    

          यावेळी डॉ. नांदवडेकर यांनी दुर्मिळ व मौल्यवान अशी २०० पुस्तके ग्रंथालयास ग्रंथ-भेट दिली. कार्यवाह वसंत पाटील यानीं ग्रंथ-भेट स्विकारली. य संस्थेचे संचालक डॉ. सत्यजित देसाई, आप्पासाहेब कुंभार, सेवानिवृत्त कर्मचारी विचार मंचचे उपाध्यक्ष मारुतीराव रेडेकर, गोविंदराव नांदवडेकर, उद्योजक शिवाजीराव पाटील, वैशाली व दिलीप नारायण पाटील, कु. आस्था विलासराव नांदवडेकर आदि जन उपस्थित होते. डॉ. विलासराव नांदवडेकर यांनी आज भाऊबीजेच्या शुभ दिनी दिलेली ही अमोल ग्रंथ-भेट ग्रंथालयाच्या दर्जा बदलाची नांदीच आहे, असे मला वाटते. २०२३ मध्ये आपले ग्रंथालय 'अ' दर्जा प्राप्त होईल. त्यासाठी डॉ. नांदवडेकर यांचे आम्ही ऋणी आहोत. त्यांच्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज आहे. ते आमचे मार्गदर्शक राहतील, याची खात्री आहे, असे विचार  शिवाजी पाटील यानी व्यक्त केले. त्यानंतर संचालक डॉ. सत्यजित देसाई यांनी छोटीसी भेट देऊन आभार मानले.

No comments:

Post a Comment