महागाव तरुण मंडळ मुंबई चा 'बुक्स ऑन बर्थडे' उपक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

07 November 2021

महागाव तरुण मंडळ मुंबई चा 'बुक्स ऑन बर्थडे' उपक्रम

महागाव येथे मुंबई तरुण मंडळामार्फत विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

         महागाव (ता. गडहिंग्लज) तरुण सेवा मंडळ मुंबई यांच्या वतीने 'कोरोना योद्धा सन्मान' व 'बुक्स ऑन बर्थडे' उपक्रम नुकताच राबविण्यात आला.

           महाकाली मंदिर हॉल महागाव येथे झालेल्या कार्यक्रमात गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. कोरोना काळात विलगिकरण कक्षात राहिलेल्या चाकरमानी व बाहेरगावच्या लोकांना शिधा स्वरूपात मदत करणाऱ्या ग्रामस्थांचे सहकार्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी  महागाव ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच व सर्व सदस्य, आरोग्य केंद्र कर्मचारी, आशा सेविका यांना कोरोना योद्धा म्हणून गौरवण्यात आले. यावेळी मुंबई तरुण मंडळाचे कार्यकर्ते, मान्यवर, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment