हलकर्णी फाट्यावर बैल वाहतूक करणारा ट्रक पलटी होऊन एक व्यक्ती व एक बैल ठार - चंदगड लाईव्ह न्युज

22 November 2021

हलकर्णी फाट्यावर बैल वाहतूक करणारा ट्रक पलटी होऊन एक व्यक्ती व एक बैल ठार

इकबाल अहमद मुल्ला


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        बेळगाव-वेंगूर्ला राज्यमार्गावर हलकर्णी फाट्यानजिक जनावरे वाहून नेणारा ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात आजरा येथील व्यापारी इकबाल अहमद मुल्ला (रा. आमराई गल्ली,ता आजरा) व एक बैल जागीच ठार झाला. काल सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ट्रक पलटी होताच आणखी दोघेजण यावेळी फरार झाले. या अपघातात आणखी एक बैल गंभीर जखमी झाला. 

अपघात होवून पलटी झालेला ट्रक
        कोकणातून ट्रक (नं. MH 09 CU1492) मधून चौदा बैल कोंबून कत्तल करण्याच्या उद्देशाने बेळगावला नेत होते. ट्रक मधील हौद्यात प्रमाणापेक्षा जास्त बैल कोंबून भरले होते. बैलांना हालचाल करायलाही वाव नव्हता. ट्रक भरधाव वेगाने हलकर्णी फाट्यावरील वळणावर आली असता पलटी झाली. या अपघातात इकबाल मुल्ला व एक बैल जागीच ठार झाला.

बैल

          याप्रकरणी पोलीस पाटील अंकुश मष्णू गुरव (वय ५२, रा.हलकर्णी) यांच्या फिर्यादीवरून चंदगड पोलिसात  इकबाल अहमद मुल्ला व त्याचे इतर दोन साथीदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नामदेव कुट्रे इतर जखमी बैलावर उपचार करत आहेत. जनावरांना बाहेर काढून त्यांची चारा पाण्याची व्यवस्था ग्रामस्थांच्या मदतीने करण्यात आली आहे. दरम्यान, गोवंश तस्करी होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. इतर जखमी बैंलावर उपचार करून कलखांब (ता. जि. बेळगाव) येथील सिध्देश्वर गोशाळेत पाठवणेत आले आहेत.

No comments:

Post a Comment