कागणी येथील सरिता देसाई हिची वक्तृत्वातून गगन भरारी - चंदगड लाईव्ह न्युज

22 November 2021

कागणी येथील सरिता देसाई हिची वक्तृत्वातून गगन भरारी

सरिता नारायण देसाई

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

         प्राथमिक शाळेत अबोल असणाऱ्या कागणी (ता. चंदगड) येथील सरिता नारायण देसाई तिने आपल्या 'वक्तृत्वाच्या' जोरावर गगनभरारी घेतली आहे. माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तिने शेकडो वक्तृत्व स्पर्धांमध्ये यश मिळवले. सध्या ती एका ट्रॅक्टर कंपनीची प्रचारक तसेच न्यूज चॅनेल अँकर म्हणून काम करत आहे. स्टार प्रचारक म्हणून आमदार बच्चू कडू यांना निवडून आणण्यात तीचा सिंहाचा वाटा होता. कोरोना काळात आपल्या कार्यामुळे चर्चेत आलेले आमदार निलेश लंके तिच्या वक्तृत्वामुळे प्रभावित झाले होते.

       नुकताच तिचा व्ही के चव्हाण- पाटील विद्यालय कागणी येथे सत्कार करण्यात आला. वक्तृत्व कलेच्या जोरावर सुद्धा आपले करियर करता येते हे सरिताने दाखवून दिले. अशा शब्दात विविध वक्त्यांनी तिचे कौतुक केले. जीवन शिक्षण संस्थेचे सचिव एम. ए. हगीदळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात मुख्याध्यापक ए. जे. देसाई, जी. आर. कांबळे, एस. आर. गुंडकल आदींची भाषणे झाली. लतिका हगिदळे यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला. यावेळी सरिताचे वडील नारायण देसाई, संस्था पदाधिकारी, शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. आभार डी. एम. जाधव यांनी मानले.

No comments:

Post a Comment