ढोलगरवाडीत अंमली पदार्थ प्रकरणी तपास सुरूच, उद्या दुपारपर्यंत तपास पुर्ण होण्याची शक्यता - चंदगड लाईव्ह न्युज

15 November 2021

ढोलगरवाडीत अंमली पदार्थ प्रकरणी तपास सुरूच, उद्या दुपारपर्यंत तपास पुर्ण होण्याची शक्यता

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथे अमली पदार्थ तस्करीप्रकरणी मुंबई क्राईम गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष पथकाने  छापा टाकून काल रात्री रविवारी रात्रीपासून तपासणी सूरू केली होती ती आज सोमवारी रात्री उशिरापर्यंत सूरूच होती.उद्या मंगळवारी याबाबत पोलिस सूत्राकडून अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.

     अंमली पदार्थ तस्करीप्रकरणी मुंबई क्राईम गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष पथकाने  तपासणी केली.मात्र तपासणीत नेमके कोणता अमली पदार्थ सापडला याचा तपशील मात्र उद्या  कळण्याची शक्यता आहे. कुणाची तपासणी केली,तपासणीत किती माल सापडला,या प्रकराणशी आणखी कुणाचा संबंध आहे का?या बाबत पोलिसानी कमालीची गुप्तता बाळगली होती.मुंबईतल्या तस्करीचा थेट संबंध ढोलगरवाडीशी आल्याने पंचक्रोशीत उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.

     पोलिसांच्या अचानक पडलेल्या छाप्याने ढोलगरवाडीत खळबळ उडाली आहे.पुरोगामी विचारांचा वारसा जपणाऱ्या या गावात अंमली पदार्थ तस्करीचा वास लागल्याने मुंबई . क्राईम गुन्हे अन्वेषणचे विशेष पथक ढोलगरवाडीत दाखल झाले . नेमके काय प्रकरण आहे , याचा लोक आज दिवसभर मागोवा घेत होते. लोक चर्चा करत होते. याबाबत घटनास्थळी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला . मात्र , पोलिसांनी तपास अपूर्ण असल्याचे सांगून मंगळवार दुपारपर्यंत तपास पूर्ण झाल्यानंतरच माहिती देणार असल्याचे सांगितले . रविवारी दुपारी तीनपासून तपास सुरू असलेल्या  कुणालाही माहिती नव्हती. याबाबत चंदगड पोलिसांनाही माहिती मिळालेली नव्हती.
No comments:

Post a Comment