दरीतील तोफा 'गडावर' मराठा सेवा संघ व सह्याद्री प्रतिष्ठानचा धाडसी व थरारक उपक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

15 November 2021

दरीतील तोफा 'गडावर' मराठा सेवा संघ व सह्याद्री प्रतिष्ठानचा धाडसी व थरारक उपक्रम

शेकडो वर्षापासून दरीत पडलेली तोफ गडावर नेताना शिवप्रेमी मावळे.

चंदगड : चेतन शेरेगार/ सी. एल. न्यूज

          दोडामार्ग तालुक्यातील फुकेरी नजीकच्या हनुमंतगड किल्ल्या खालील दरीत शेकडो वर्षापासून शिवकालीन तोफा पडल्या होत्या. छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची ज्वलंत साक्ष देणाऱ्या या दुर्मिळ तोफा पुन्हा गडावर आणण्याची मर्दुमकी कोकणातील मावळ्यांनी दाखवली. 

         दरीतून किल्ल्याची मोठी चढण, वाटेतील दगड-धोंडे, झाडेझुडपे, काटे- कुटे, रक्तपिपासू कीटक यावर मात करत मराठा सेवा संघ गोवा राज्य शाखा, सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग, दोडामार्ग तालुका अखिल भारतीय मराठा जागृती मंचच्या मावळ्यांनी तोफ गडावर पोचवण्याची मोहीम तीस तासांच्या अथक प्रयत्नानंतर फत्ते केली. व शिवरायांचा भगवा डौलाने गडावर फडकला. मोहीमेच्या आदल्या रात्री एक दिवा आपल्या राजाला, गडकोटांना या अंतर्गत दीपोत्सव साजरा केला. 

         दिनांक १३ व १४ नोव्हेंबर दोन दिवस  तोफ किल्ल्यावर पोहोचवण्यासाठी तीस तासांची यशस्वी मोहीम राबवली. यात गोमंतकीय मावळे शिवश्री कल्लाप्पा पाटील, बळवंत पाटील, भरत पाटील, राजाराम गावडे, प्रदीप गावडे, प्रमोद मगर, जगदीश जाधव, चंद्रकांत पाटील, महेश रेडेकर, सागर बांदिवडेकर, किरण हुंदळेवाडकर, अक्षय गावडे, लक्ष्मण तुर्केवाडकर, अनिकेत पाटील आदी शिवप्रेमी मावळे, मराठा सेवा संघ, सह्याद्री प्रतिष्ठानचे सदस्य व फुकेरी ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले. तोफ गडावर पोहोचतात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

No comments:

Post a Comment