'बारी' वरील 'सबूद' नाटकाचा मुहूर्त २१ नोव्हेंबर रोजी मुंबईत - चंदगड लाईव्ह न्युज

15 November 2021

'बारी' वरील 'सबूद' नाटकाचा मुहूर्त २१ नोव्हेंबर रोजी मुंबईत


कालकुंद्री / सी. एल. वृत्तसेवा

          स्वामीकार, पद्मश्री रणजित देसाई यांच्या गाजलेल्या 'बारी' कादंबरीवर आधारित दोन अंकी महानाट्य 'सबूद' चा मुहूर्त २१ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे होणार आहे. 

डोंबिवली येथे 'सबूद' नाटकाच्या ऑडिशन्स प्रसंगी उपस्थित नाट्यसंस्कार चे सदस्य व मान्यवर.

       चंदगड तालुक्यातील मुंबई स्थित हौशी कलाकारांनी स्थापन केलेल्या नाट्यसंस्कार मंडळाच्यावतीने डोंबिवली येथे या नाटकातील भूमिका व पात्र निवडीसाठी १४ नोव्हेंबर रोजी ऑडिशन्स घेण्यात आले. त्याला तालुक्यातील मुंबईस्थित कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कलाकार निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली असून नाटकाचा शुभमुहूर्त २१ नोव्हेंबर रोजी रणजित देसाई यांच्या कन्या पारू नाईक, मधुमती शिंदे, गौरव नाईक व मान्यवरांच्या  उपस्थितीत साजरा होणार आहे. नाटकाचा पहिला प्रयोग चंदगड तालुक्यात मार्च किंवा एप्रिल मध्ये घेण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत अशी माहिती दिग्दर्शक जीवन कुंभार यांनी दिली. यावेळी निर्माता शिवाजी विष्णू पाटील, संजय कृष्णा पाटील, लेखक सन्ना मोरे, कृष्णा बामणे, विष्णू पाटील आदींची उपस्थिती होती. या नाटकाबद्दल रणजित देसाई प्रेमी वाचक व नाट्यरसिकांत मोठी उत्सुकता दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment