ग्रुप ग्रामपंचायत पुंद्रा कार्यक्षेत्रातील मौजे कानुर बु . व मासुरे येथे गॅस कनेक्शन वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

06 November 2021

ग्रुप ग्रामपंचायत पुंद्रा कार्यक्षेत्रातील मौजे कानुर बु . व मासुरे येथे गॅस कनेक्शन वाटप

 

कानुर  येथे गॅस कनेक्शन वितरण करताना सरपंच सौ. सुवर्णा यमेटकर व उपस्थित लाभार्थी

तेऊरवाडी -सी .एल. वृत्तसेवा
      ग्रुप ग्रामपंचायत पुंद्रा मधील मौजे कानुर बु. व मासूरे येथे पाडव्याचा मुहुर्त साधून  प्रधानमंत्री उज्वला योजना - 2 अंतर्गत गॅस शेगडी सरपंच सौ. सुवर्णा येमेटकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तर मौजे कानुर  ( बामनाकिवाडी ) येथे सामाजिक कार्यकर्ते सचिन आगलावे यांच्या हस्ते  गॅस कनेश्कन वाटप करण्यात आले.
         गेल्या अनेक वर्षापासून ग्रामीण भाग चूल विरहित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अनेक प्रकारच्या चुलींच्या रचना ही वापरात आल्या आणि गेल्याही परिस्थिती मात्र, आहे तशीच राहिली.
चुलीतील धुरामुळे महिलांना त्रास होतो आणि त्यामुळे त्या विविध आजारांना बळी पडतात. स्वयंपाक करत असताना घराच्या आतल्या आतच खेळत राहणाऱ्या या धुरामुळे स्त्रिया व त्यांच्या आसपास बागडत असलेले लहान बालके रोगग्रस्त होऊ शकतात. जवळच्या जंगलातून व शेतातून गोळा करुन आणलेली लाकडे, चिपाड, वाळलेले गवत वा थापवलेल्या शेणाच्या गोवऱ्या इत्यादींचा वापर करुन ग्रामीण भागातील स्त्रियांना स्वयंपाक करतात. अनेकवेळा इंधन जमा करण्याकरिता महिलांची पायपीटही होते. त्यामुळे चुलीभोवती ग्रामीण भागातील सामाजिक, आर्थिक व आरोग्य विषयक समस्यांचे जाळे पसरलेले जाणवते. ते दूर करण्यासाठी पुढाकार घेवून प्रधानमंत्री ‘उज्ज्वला योजना’ कार्यान्वित करण्यात आली. ग्रुप ग्रामपंचायत पुंद्रा मधील मौजे कानुर बु . व मासूरे येथे पाडव्याचा मुहुर्त साधून  प्रधानमंत्री उज्वला योजना 2 अंतर्गत गॅस शेगडी सरपंच सौ. सुवर्णा येमेटकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. मौजे कानुर  ( बामनाकिवाडी ) येथे सामाजिक कार्यकर्ते सचिन आगलावे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी एचपी गॅस    एजन्सीचे  मालक  सचिन पाटील, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण मटकर  व ग्रामस्थ व लाभार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण मटकर यांनी, महिला सक्षमीकरण व त्यांच्या आरोग्याची निगा राखणे, स्वयंपाक करताना लाकडी जळण वापरल्यामुळे होणारे तीव्र दुष्परिणाम कमी करणे, स्वयंपाकासाठी अस्वच्छ जळण वापरल्यामुळे होणारे दुष्परिणाम कमी करणे, घरात लाकडी जळण वापरल्यामुळे लहान बालकांना बऱ्याच मात्रेत होणाऱ्या श्वासोच्छवासाच्या तक्रारी दूर करणे, हा मुख्य उद्देश या योजनेचा आहे असे प्रतिपादन करून गॅस वाटपाबाबत समाधान व्यक्त केले.




No comments:

Post a Comment