हत्तीचा धुमाकूळ, ट्रॉली केली पलटी, पाण्याच्या टॉकीसह ऊसाचे केले नुकसान, वाचा कोठे घडली घटना... - चंदगड लाईव्ह न्युज

23 November 2021

हत्तीचा धुमाकूळ, ट्रॉली केली पलटी, पाण्याच्या टॉकीसह ऊसाचे केले नुकसान, वाचा कोठे घडली घटना...

 

शेतात शिरलेला तस्कर हत्ती

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालूक्यात हत्तीचा धुमाकुळ चालूच असून काल दि. २२ रोजी रात्री शेवाळे येथे पांडूरंग बाळू मळवीकर यांच्या शेतात हत्तीने प्रचंड नुकसान केले.
शेवाळे येथे हत्तीने पाडलेली ट्रॉली व फोडलेली पाण्याची टॉकी

      महादेव मंदिर शेजारी असणाऱ्या शेतमध्ये उभी असलेली ट्रॉली हत्तीने पलटी करून टाकली. घराशेजारी असणारी १ हजार रूपयांची पाण्याची प्लास्टीकची व शेजारी असणारा बॅरल फोडून टाकला. त्याबरोबरच गवताची गंजी विस्कटून  शेतातील ऊसाचेही मोठे नुकसान केले आहे. 

रात्री उशिरा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन हत्तीला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. हत्तीकडून वारंवार होणाऱ्या या नुकसानिला थांबवायचे असेल तर काही तरी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment