एस. जी. एम. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दहावी विद्यार्थ्यांची TCS मध्ये निवड - चंदगड लाईव्ह न्युज

15 November 2021

एस. जी. एम. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दहावी विद्यार्थ्यांची TCS मध्ये निवड

टीसीएसमध्ये निवड झालेले विद्यार्थी.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १० विद्यार्थ्यांची TCS या नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड झाली आहे. सदर विद्यार्थी इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल व कंप्युटर सायन्स या विभागातील आहेत. त्यांना वार्षिक 4 लाख रुपये पॅकेज मिळाले आहे. कंपनीतर्फे निवड प्रक्रिया ऑनलाईन टेस्ट, ऑनलाईन मुलाखती द्वारे पार पडली. सदर विद्यार्थी अंतिम वर्षात शिकत असून या विद्यार्थ्यांची निवड ही इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक आहे. यामध्ये सोमनाथ शिंत्रे, रतन कराटे, आकांक्षा पाटील, मानसी पाटील, पल्लवी पाटील, अंकिता मदकरी, विशाल पाटील, सपना पाटील, धनश्री नेवरेकर व विनायक सोळांकूरे यांचा समावेश आहे. त्याचबरोबर विप्रो, कोग्नीझंट, वरचुसा या कंपनीचा निकाल येत्या काही दिवसात अपेक्षित असून यामध्ये सुद्धा एस जी एम आपला वेगळा ठसा उमटवेल अशी खात्री संस्थापक अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब चव्हाण यांनी व्यक्त केली.  आतापर्यंत 30 पेक्षा जास्त नामांकित कंपन्यामधून १४५ हून अधिक विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यामध्ये संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय अग्रेसर राहिले आहे अशी माहिती संस्थेचे संचालक डॉ. यशवंत चव्हाण व डॉ. संजय चव्हाण यानी दिली. यावेळी संस्थेचे सचिव अँड. बाळासाहेब चव्हाण, प्राचार्य डॉ संजय सावंत, प्रा. संतोष गुरव, प्रा. महादेव बंदी, सर्व विभागप्रमुख, प्लेसमेंट विभागाचे सर्व  समन्वयक व सर्व शिक्षक यांच्या हस्ते निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना पालक नेवरेकर आणि मदकरी आपल्या पाल्याना नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच संस्थेतील इतर विविध उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.

No comments:

Post a Comment