चंदगड तालुक्यातील दुर्गम काजिर्णे धनगरवाड्यावरील 25 मुलांना सायकलींची भेट - चंदगड लाईव्ह न्युज

03 December 2021

चंदगड तालुक्यातील दुर्गम काजिर्णे धनगरवाड्यावरील 25 मुलांना सायकलींची भेट

काजिर्णे धनगरवाड्यावरील 25 मुलांना सायकलीं 'ऑपरेशन मदत' च्या माध्यमातून भेट देण्यात आल्या. 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       चंदगड तालुक्यातील दुर्गम भागातील काजिर्णे धनगरवाड्यावरील 25 मुलामुलींची धनगरवाडा ते सरकारी न्यु इंग्लिश हायस्कूल (7/8 किमी) चंदगडपर्यंतची व संध्याकाळी परत शाळा ते घर, अशी जंगलातील रस्त्यावरून होणारी दररोजची (15/16किमी) पायपीट 'ऑपरेशन मदत' च्या माध्यमातून संपवली.

       याकामी व्हिक्टर फ्रांसिस, बबन कुगजी, अक्षय हुंशीकट्टी, प्रसाद पाटील, चंद्रकांत धामणेकर, डॉ. सुरेखा पोटे, डाॅ राजश्री अनगोळ, डाॅ अनिल पोटे, गितांजली रेडेकर, विजय बद्रा, संतोष अनगोळकर, डाॅ केतकी पावसकर व प्रशांत बिर्जे या दानशूरांनी मदत केली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसाद हुली, संतोष दरेकर, रिक्षा मामा, प्राचार्य आर. आय. पाटील, संजय साबळे, शरद हदगल, माऊली ट्रांसपोर्ट, बेलगाम बायसन जीपर्स ग्रूप, काजिर्णे धनगरवाड्याचे गावकरी व 'ऑपरेशन मदत' च्या कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान लाभले.

        'ग्रामीण शिक्षण अभियान' अंतर्गत दुर्गम भागातील शाळकरी मुलांमुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी 'ऑपरेशन मदत' तर्फे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. सद्या खानापूर तालुक्यात व चंदगड तालुक्यात येणाऱ्या दुर्गम भागातील, धनगरवाड्यावरील शाळेच्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य करण्यात येत आहे. याकामी 'ऑपरेशन मदत' अंतर्गत विविध संस्था व संघटनांनी पुढाकार घेतला आहे. शिक्षण, क्रिडा, कला व क्षेत्रातील मान्यवर तज्ञांनी या उपक्रमात सहभागी व्हावे आणि देशाच्या नव्या पिढीला घडविण्यासाठी हातभार लावावा.



No comments:

Post a Comment