हेरे सरजांम प्रकरणी चंदगडला ७ डिसेंबरपासून बेमुदत उपोषणाचा इशारा, कोणी दिला......वाचा सविस्तर.... - चंदगड लाईव्ह न्युज

03 December 2021

हेरे सरजांम प्रकरणी चंदगडला ७ डिसेंबरपासून बेमुदत उपोषणाचा इशारा, कोणी दिला......वाचा सविस्तर....

भिमराव चिमणे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          चंदगड तालुक्यातील ४७ गावातील शेतकऱ्यांच्या हेरे सरंजामच्या वर्ग -२ च्या जमिनी वर्ग -१ करण्याचे काम प्रलंबित राहिल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. प्रशासनाने तत्काळ ६ डिसेंबरपूर्वी हा प्रश्न सोडवण्याच्यासाठी ठोस उपाययोजना न आखल्यास मंगळवार ७ डिसेंबरपासून चंदगड तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणकरणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते भीमराव चिमणे यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आमदार राजेश पाटील, प्रांताधिकारी, चंदगड तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

      चंदगड तालुक्यातील ४७ भीमराव गावातील शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न बनलेल्या हेरे सरंजामाच्या वर्ग -२ असलेल्या जमिनी वर्ग -१ करण्याचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. २००१ साली शासननिर्णय होऊन हा प्रश्नसोडवण्यात आला आहे. परंतु महसूल खात्यातील लालफितीच्या कारभारामुळे हा प्रश्न शासनाने सोडवूनही प्रत्यक्ष लाभ त्याचा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. चिमणे हा प्रश्न सोडवण्यासाठी मागील जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पुढाकार घेतला होता. २६ जानेवारी २०२० पर्यंत हा प्रश्न संपविण्याचे आदेश दिले गेले होते. परंतु कोरोनामुळे काम रखडले. दुर्देवाने या प्रश्नाची जाण असलेल्या जिल्हाधिकारी यांची बदली झाली. नूतन जिल्हाधिकारी यांनी ६ डिसेंबर पूर्वी हा प्रश्न सोडवण्याच्यासाठी ठोस उपाययोजना न आखल्यास नाईलाजाने ७ डिसेंबर पासून चंदगड तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. 

No comments:

Post a Comment