कालकुंद्री / सी. एल. वृत्तसेवा
मराठी विद्यामंदिर कामेवाडी (ता. चंदगड) शाळेचे अध्यापक मारूती इराप्पा तळवार (कुदनूर, ता चंदगड) यांना कला, साहित्य, सामाजिक, लोकसंवाद प्रतिमा संमेलन कोल्हापूर यांचेमार्फत दिला जाणारा 'महाराष्ट्र प्रतिमा, आदर्श शिक्षक पुरस्कार' नुकताच प्रदान करण्यात आला.
शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेते माधव अभ्यंकर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात आले. मारुती तळवार एक अष्टपैलू विद्यार्थी प्रिय व पालक प्रिय शिक्षक म्हणून परिचित आहेत. कला, संगित, गायन, वादन आणि क्रीडा विषयात त्यांचा हातखंडा आहे. पुरस्काराबद्दल कोवाड केंद्रातील शिक्षक, मुख्याध्यापकांच्या वतीने त्यांचा केंद्र शाळा कोवाड येथे सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रप्रमुख सुधीर मुतकेकर, केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत वै पाटील, सुनील कुंभार, नारायण कोकितकर, श्रीकांत सुब्राव पाटील, श्रीकांत आप्पाजी पाटील, संजय सोनार, गणपती लोहार यांचेसह केंद्रातील मुख्याध्यापक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment