वाढदिवसानिमित्य शाळेला स्वप्नालीने दिली पुस्तक भेट - चंदगड लाईव्ह न्युज

28 December 2021

वाढदिवसानिमित्य शाळेला स्वप्नालीने दिली पुस्तक भेट

वाढदिवसानिमित्य शाळेला पुस्तक भेट देताना स्वप्नाली वांद्रे

अडकूर / सी. एल. वृत्तसेवा

        वाढदिवस म्हणजे मूलांचा अत्यंत आनंदाचा क्षण. नाचणे, बागडणे, नविन ड्रेस, केक, भेटवस्तू अन मेजवानी. पण या सर्वाला बाजूला सारत विंझणे (ता. चंदगड) येथील कु. स्वप्नाली मारूती वांद्रे या विद्यार्थिनिने शाळेला शिवाजी सावंत यांचे छावा पुस्तक भेट देवून सर्वासमोर एक आदर्श निर्माण केला.

         श्री शिवशक्ती हायस्कूल अडकूर येथे इयत्ता १० वी च्या वर्गात शिकणारी स्वप्नाली अभ्यासात हुशार तर आहेच पण याबरोबरच शाळेच्या  इतर सर्व कार्यक्रम व स्पर्धामध्येही हिरीरीने सहभाग घेते. मग तो शाळेचा गीत मंच असो की भाषण, रांगोळी, निबंध स्पर्धा असोत या सर्वामध्ये तीचा सहभाग निश्चित ठरलेला. अशा हरहून्नरी असणाऱ्या स्वप्नालीने आपला वाढदिवस अगळ्या वेगळ्या पद्धतिने साजरा केला. शाळेच्या ग्रंथालयासाठी स्वप्नालीने महागडे पण मौल्यवान असणारे ऐतिहासिक छावा पुस्तक भेट देवून सर्व मुलांसमोर वेगळा आदर्श निर्माण केला. याबद्दल शाळेच्या वतीने एस. एन. पाडले, पी. के. पाटील, एस. के. पाटील, आय. वाय. गावडे, श्री. निर्मळकर यानी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment