चंदगड तालुक्याच्या विकासासाठी नेहमी राबलो - नांदवडे येथे विकास कामांच्या उद्घाटनावेळी भरमूअण्णापाटील यांचे प्रतिपादन - चंदगड लाईव्ह न्युज

28 December 2021

चंदगड तालुक्याच्या विकासासाठी नेहमी राबलो - नांदवडे येथे विकास कामांच्या उद्घाटनावेळी भरमूअण्णापाटील यांचे प्रतिपादन

नांदवडे (ता. चंदगड) येथे काँक्रीटच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करताना माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील, शेजारी शिवाजीराव पाटील, जि. प. सदस्य सचिन बल्लाळ व सरपंच राजेंद्र कांबळे. 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         चंदगड आजरा व गडहिंग्लज तालुक्याच्या विकासाचे ध्येय ठेवून राबलो. सर्वसामान्य गोरगरिबांना शासनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या याचे मोठे समाधान आहे, असे मत माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील यांनी व्यक्त केले. नांदवडे येथे विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

नांदवडे येथे जि. प. सदस्य सचिन बल्लाळ यांच्या फंडातून मंजूर झालेल्या रस्त्याचा शुभारंभ करताना जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, शेजारी इतर मान्यवर.

       प्रारंभी जि. प. सदस्य सचिन बल्लाळ यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बल्लाळ यांच्या फंडातून मंजूर झालेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. बल्लाळ म्हणाले, पाच वर्षात माझ्या मतदारसंघा बरोबरच मतदारसंघा बाहेरील आपुलकीच्या गावात सुद्धा विकास कामांसाठी निधी दिला.  यापुढील काळात प्रत्येक गावच्या विकासासाठी माझे सहकार्य राहील. मतदारांनी आत्तापर्यंत जसे सहकार्य केले तसेच यापुढे सुद्धा करावे. माथाडी कामगार संघटनेचे शिवाजीराव पाटील यांनी गावातील शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. विठोबा गावडे, एन. एस. पाटील, सुधाकर पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. भिवाजी पवार, बाबूराव पाटील, यशवंत पाटील,  के. बी. गावडे, संपत पेडणेकर, परशराम फडके, नामदेव कांबळे, आर. जी. पाटील, संजय गावडे, मारुती पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच राजेंद्र कांबळे यांनी स्वागत केले. जे. जी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. जयवंत पेडणेकर यांनी सुत्रसंचालन केले. सदानंद गावडे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment