जाहिरातीच्या काळात ग्राहकाने जागरुक रहावे - अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे संदीप जंगम यांचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

28 December 2021

जाहिरातीच्या काळात ग्राहकाने जागरुक रहावे - अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे संदीप जंगम यांचे आवाहन

पाटणे फाटा  (ता. चंदगड) येथील व्ही. के. चव्हाण-पाटील महाविद्यालयात ग्राहक दिन पंधरवडा निमित्त कार्यक्रमावेळी उपस्थित मान्यवर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         जाहिरीरातीच्या माध्यमातून अनेक लोकांची फसवणूक केली जात आहे. वस्तूची मुळ किंमत आणी ग्राहकाला मिळणारी वारंटी ग्यारंटी याकडे कुणाचे लक्ष नाही. त्यामुळे ग्राहक अशा अमिशांना बळी पडत आहे. त्यामुळे आपले ग्राहक हक्क व कर्तव्य याबाबत आपण जागरूक असणे आवश्यक आहे. जागरूक नागरिक हाच देशाचा सुज्ञ नागरिक आहे असे मत अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे संदीप जंगम यांनी व्यक्त केले. ते पाटणे फाटा  (ता. चंदगड) येथील व्ही. के. चव्हाण-पाटील महाविद्यालयात ग्राहक दिन पंधरवडा निमित्त कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य यु. डी. पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून ग्राहक पंचायतीचे कोल्हापूर जिल्हा संघटक जगन्नाथ जोशी उपस्थित होते. 

        स्ताविक एस. डी. बागडी यांनी केले. जंगम पुढे म्हणाले, ``जन्माच्या आधीपासून ते मरणाच्या शेवट कालावधीपर्यंत माणूस हा एक ग्राहक असतो. त्यामुळे आपण वस्तु अथवा अन्य गोष्टी खरेदी करताना वस्तूची महत्तम किंमत, प्याकिंग, डेटबार तारीख पाहणे आवश्यक आहे. फसवणूक झाल्यास ग्राहक न्यायालयात दाद मागणे गरजेचे आहे. यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत आपल्याला आवश्यक ती मदत करील असे सांगितले. युवकांनी या संघटनेत भाग घेऊन ग्राहक हक्क व कर्तव्य याबाबत जनजागृती करण्यास सहकार्य करावे असे सांगितले.

          यावेळी मारुती पाटील, गणपत पवार प्रताप डसके, विलास कागणकर, एन. एन. शापूरकर, सी. एल. गावडे, एस. जे. तुप्पारे, पी. एन. कदम, पी. एन. इंजल, ए. टी. आपके, एम. एन. सामंत आदी उपस्थित होते. आभार विलास नाईक यांनी मानले.

No comments:

Post a Comment