संविधान संवाद यात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

06 December 2021

संविधान संवाद यात्रेला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हरळी खुर्द येथे संविधान संवाद यात्रा प्रसंगी मार्गदर्शक तानाजी कुरळे यांचे स्वागत करताना पांडुरंग चौगुले.
 यावेळी उपस्थित अखलाक मुजावर व मान्यवर.

महागाव : सी. एल. वृत्तसेवा

       महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा कोल्हापूरच्या  वतीने २६ नोव्हेंबर पासून सुरू असलेल्या संविधान संवाद यात्रेला गडहिंग्लज तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

     छ. शिवाजी विद्यालय महागाव येथे सरपंच सौ. जोस्त्ना पताडे व  मुख्याध्यापक ना. सी. घोलप यांनी तर शिवराज महाविद्यालय गडहिंग्लज येथे प्रा. प्रकाश भोईटे व प्रा. कुराडे  यांनी संविधान संवाद यात्रेचे स्वागत केले. डॉ. घाळी कॉलेज व ओंकार कॉलेज गडहिंग्लज येथेही उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

    हरळी खुर्द येथे अनिस चे तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र पताडे व प्रधान सचिव शशिकांत चौगले यांनी गावच्या सरपंच सौ. उर्मिला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैष्णवी पाडले यांनी केले. यावेळी राज्य सरचिटणीस प्रा. कृष्णात सारथी यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यपद्धतीबाबत तर  प्रा. प्रकाश नाईक यांनी संविधान म्हणजे काय? याबद्दल माहिती सांगितली. यावेळी  चन्नेकुपी (ता. गडहिंग्लज) चे पोलीस पाटील तानाजी कुरळे यांनी संविधानाची ठळक वैशिष्ट्ये, लोकशाहीचे संवर्धन करण्यासाठी नागरिकांची कर्तव्ये याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास ग्रामसेवक तुकाराम हणमंते, शिव सहकार सेना तालुका संघटक अकलाख मुजावर, निवृत्त पोलिस उपनिरीक्षक पांडूरंग चौगले, सुवर्णा कुंभार, भास्कर सुतार, निशांत शिंदे, तुकाराम देसाई(महाराज), महादेव नाईक, बाबुराव पाटील, गौतम कांबळे, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शशिकांत चौगले यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment