जमिनीच्या वादातून हलकर्णी येथे काजू बागेचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

06 December 2021

जमिनीच्या वादातून हलकर्णी येथे काजू बागेचे नुकसान

हलकर्णी (ता. चंदगड) येथील दत्तू सावंत यांची जेसीबीच्या सहाय्याने उखडून टाकलेली काजूची झाडे.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         हलकर्णी (ता. चंदगड) येथील दत्तू आनंदा सावंत यांच्या शेतातील काजूच्या आठ झाडासह ठिबक सिंचन व पाईपलाईनचे जेसीबीच्या सहाय्याने मोठे नुकसान केल्याची फिर्याद दत्तू सावंत यांनी शिवाजी सखोबा सावंत (रा. हलकर्णी, ता. चंदगड) यांच्या विरोधात चंदगड पोलिसात दिली आहे. 

       हलकर्णी येथील  गट नंबर ५५५ मधील शेतजमिनीचा न्यायालयात वाद सुरू आहे. शिवाजी सावंत यांच्या सांगण्यावरून प्रवीण राठोड या जेसीबी चालकाने आठ झाडे मुळासाहित उखडून टाकली. यामध्ये दत्तू सावंत यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

No comments:

Post a Comment