मुंबई येथील आझाद मैदानावर चालू असलेल्या आंदोलनात बोलताना पी .के. पाटील |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसंस्था
आझाद मैदानावर सुरू असलेल्या शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनात चंदगड तालूक्यातील शिक्षकानी सहभाग घेऊन जुन्या पेन्शन योजनेसाठी आपल्या तिव्र भावना मांडल्या .
यावेळी श्री शिवशक्ती हायस्कूल व न्यूनिअर कॉलेज अडकूरचे अध्यापक पी .के. पाटील , चतुःर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजित गणाचारी यानी शासनाने जुनी पेन्शन योजना त्वरीत लागू करण्याची मागणी केली . या आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत . चंदगड तालूक्यातूनही मोठया संख्येने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत .
शिक्षक आमदारांनी आंदोलनस्थळी भेट देऊन या आंदोलनाला पाठिंबा देवून आम्ही
तुमच्या सोबत असल्याची ग्वाही दिली. यामध्ये शिक्षक आमदार जयंत आसगावकर, आ. विक्रम काळे, आ. किशोर दराडे, आ. बाळाराम पाटील, सुधीर तांबे, आ. अरुण लाड, आ. अभिजित वंजारी, आ. किरण सरनाईक यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
आम्ही या अधिवेशनात तुमची मागणी मांडणार आहोत. या कामी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री यांची सर्व आमदार एकत्र भेट घेणार आहोत. या अधिवेशनात आपले काम झाले नाही, तर प्रसंगी आम्ही सर्व आमदार तुमच्या प्रश्नासाठी तुमच्यासोबत रस्त्यावरची लढाई लढण्यास तयार आहेत. तुम्हाला न्याय मिळवून देणारच, हीच आमची भूमिका असेल, असे मत सर्व आमदारांनी मांडले.
No comments:
Post a Comment