बटकणंगले येथून एकजण बेपत्ता - चंदगड लाईव्ह न्युज

06 December 2021

बटकणंगले येथून एकजण बेपत्ता

पांडूरंग  मटकर
नेसरी / सी. एल. वृत्तसेवा

       बटकणंगले (ता. गडहिंग्लज) येथून पांडूरंग रखमाना मटकर (वय -६५  वर्षे, रा. बटकणंगले) हे गेल्या ४५ वर्षापासून बेपत्ता असल्याची फिर्याद नेसरी पोलिसात भरमा रखमाना मटकर यांनी दिली आहे. पांडूरंग १० डिसेंबर १९७७ रोजी आपल्या घरातून कोणासही काहीही न सांगता निघून गेले आहेत. त्यावेळी त्यांचे वय २१ वर्षे होते तर आता त्यांचे वय ६५ वर्ष आहे सहावी पर्यंत शिक्षण झालेला पांडूरंग रंगाने गोरा, अंगाने मजबूत, उंची ५ फूट ६ इंच, नाक सरळ, चेहरा उभा, डोळे काळे आहेत. अशा वर्णनाची व्यक्ती कोणाला आढळल्यास नेसरी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment