३२ वर्षानंतर महागाव येथे रंगला स्नेहमेळावा, जुन्या आठवणींना उजाळा - चंदगड लाईव्ह न्युज

31 December 2021

३२ वर्षानंतर महागाव येथे रंगला स्नेहमेळावा, जुन्या आठवणींना उजाळा

महागाव येथे ३२ वर्षानंतर श्री राम डी .एड. कॉलेज नेसरीचे जमलेले विद्यार्थी

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

                                   मैत्री आपली सर्वांची,

                  मनात छान रुजलेली,

                                 वर्षानुवर्षे भावनांच्या, 

                  थेंबाथेंबात भिजलेली,  

        सुमारे अडीच वर्षाच्या तपानंतर म्हणजेच ३२ वर्षाच्या अविरत विश्रांतीनंतर नेसरीच्या  डी.एड.सन 1986 ते 1989 बॅचचा स्नेह मेळावा  अनिकेत मंगल कार्यालय महागाव येथे  खूप उत्साहात  संपन्न झाला.  "सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभू" या ईश्‍वराच्‍या आराधनेने कार्यक्रमाची बहारदार सुरुवात झाली. स्नेह मेळाव्याच्या अध्यक्षस्थान  बी. एम पाटील  संस्थापक श्री राम डी.एड.कॉलेज नेसरी यांनी भूषविले . "स्वागत करू सर्व मिळूनी प्रेमभरे आनंदे" या स्वागत गीताने यमेटी (ता. गडहिंग्लज) शाळेच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. संगीत साथ एम.व्ही पाटील यांनी दिली. सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांनी केले. 

        प्रास्ताविक बी. एम. पाटील यांनी सर्व गुरुवर्य, लिपिक, शिक्षकेतर कर्मचारी त्यांच्या कार्याचा यथोचित आढावा घेतला. 

 प्रास्ताविकानंतर शाल श्रीफळ व अंगठी साडी,पुष्पगुच्छ असा आहेर देऊन सपत्नीक बी. एम. पाटील संस्थापक अध्यापक विद्यालय नेसरी यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर सचिव एम. आर. पाटील, बी. जी. जाधव, ए. जे. देसाई, अजय भोसल, लिपिक एम. एस. पाटील, ईश्वर मटकर, शांताराम पाटील, देवाप्पा तुपूरवाडी, नारायण भुंईबर आदिंचा सत्कार करण्यात आला.यावेळी नंदकुमार वाईंगडे, बी. ए.पाटील, राजू सावर्डेकर, सलीम मुल्ला, बाबू गवंडी, शोभा सौदलगे /लवटे, दस्तगीर उस्ताद, एन. आर. पाटील, संतू कांबळे, जे. टी. पाटील, बी. जी. जाधव, ए. जे. देसाई, सचिव एम. आर. पाटील, नरसू पाटील, संस्थापक बी. एम. पाटील यानी मनोगते व्यक्त केली.

       सूत्रसंचालक सदानंद पाटील यांनी केले. आभार मधुकर कोकितकर यांनी केले.

No comments:

Post a Comment