चंदगड माडखोलकर महाविद्यालय व नेहरू युवा केंद्राच्या वतीने आयोजित वक्तृत्व स्पर्धेत सरिता देसाई प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

01 December 2021

चंदगड माडखोलकर महाविद्यालय व नेहरू युवा केंद्राच्या वतीने आयोजित वक्तृत्व स्पर्धेत सरिता देसाई प्रथम

सरिता देसाई

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         नेहरू युवा केंद्र व र. भा. माडखोलकर महाविद्यालय चंदगड यांच्या संयुक्त विद्यमाने चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात पार पडलेल्या  तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सरिता देसाई (कागणी) हिने  प्रथम क्रमांक मिळवला. तर द्वितीय सोनाली दळवी (पाटणे, तृतीय इंद्रायणी पाटील (सुंडी), रायमन  मंतेर  (सुरूते) यानी मिळवला. 

चंदगड येथील नेहरू युवा केंद्रांच्य वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या सरिता देसाई हिला पुस्तक व सन्मानपत्र देताना रेश्मा जाधव-पाटील

         या स्पर्धेत एकूण दहा स्पर्धकांनी घेतला होता. यापैकी तिघांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली. पुढे ही स्पर्धा राज्य व राष्ट्रीय स्तरावर होणार आहे. प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्पर्धेत  'देशभक्तीवर राष्ट्रनिर्माण' हा विषय होता. यशस्वी स्पर्धकांना हलकर्णी येथील आदर्श बेकरी  यांच्यामार्फत पुस्तके देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. सरोजीनी दिवेकर, प्रा. एस. एन. पाटील व डी. एन. मोरे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे आयोजन नेहरू युवा केंद्राचे चंदगड तालुका प्रतिनिधी अमेय सबनीस व रेश्मा पाटील हे उपस्थित होते. आभार प्रा. आर. एस. पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment