फेरफार मधील नावे कमी केल्याने सुळेरान येथील मंडलाधिकारी व तलाठी यांच्याविरोधात आमरण उपोषणाचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

01 December 2021

फेरफार मधील नावे कमी केल्याने सुळेरान येथील मंडलाधिकारी व तलाठी यांच्याविरोधात आमरण उपोषणाचा इशारा

सुळेरान ता.आजरा येथील फेरफार मधील नावे कमी करणाऱ् विरोधात कारवाई करावी या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार संजय कांबळे याना देताना सामाजिक कार्यकर्ते आसिस कुतिनो

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      सुळेरान (ता. आजरा) येथील तलाठी, सर्कल यांच्या बेजबाबदार कामकाजाविरोधात आजरा तहसील कार्यालयासमोर दि. ८ डिसेंबर पासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा चंदगड येथील सामाजिक कार्यकर्ते व दिव्यांग संघटनेचे संचालक आसिस कुतिनो यांनी दिला आहे. आजरा - सुळेरान येथील गट नं . २२१ ही जमिन गेली २३ वर्षे ते स्वतःभात , कसत असून शेतात त्यांच्या पत्नी रिबेका कुतिनो यांच्या नावे वीज मोटरपंप , सर्वोदय सेवा संस्थेमध्ये कर्जदार सभासद असून आज तागायत शेतात ऊस , भाजीपाला, अशी शेती करीत आहेत. सेवा सोसायटीचे १५ हजार कर्ज शासनाकडून माफ झाले. सोसायटीचा बोजा नोंद कमी करण्याचे सोडून सुळेरान येथील तलाठी यांनी कोणतीही सुचना न देता रिबेका कुतिनो क ' नुसार यांचे सातबारावरील नाव कमी केले आहे. तलाठी, सर्कल यांची कायदा कलम ११ हितसंबंधीताना लेखी नोटीस काढणे कायद्याने बंधनकारक असताना देखील या कायद्याकडे दुर्लक्ष केले आहे. गट न. २२१ व २२८ चे मूळ खातेदार रिबेका कुतीनो यांचे आजोबा पावसू बार्देस्कर हे होते. गट नं. २२८ मध्येही गैर व्यवहार होऊन त्याबाबत लेखी तक्रार देऊनही त्याची तलाठी, सर्कलयांनी दखल घेतली नाही. या संबंधीचे पत्र पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी, तहसीलदार आजरा यांना देऊन डायरी दुरुस्ती करून सातबारा पूर्ववत करावा अशी मागणी केली आहे.+

No comments:

Post a Comment