शिनोळीच्या यशवंत विकास सेवा संस्थेवर आमदार राजेश पाटील गटाची निर्विवाद सत्ता , विरोधी पॅनलचा धुव्वा - चंदगड लाईव्ह न्युज

19 December 2021

शिनोळीच्या यशवंत विकास सेवा संस्थेवर आमदार राजेश पाटील गटाची निर्विवाद सत्ता , विरोधी पॅनलचा धुव्वा

यशवंत विकास संस्थेच्या निवडणूकीत विजयी झालेले सत्ताधारी दुर्गामाता महालक्ष्मी पॅनेलचे विजयी उमेदवार व समर्थक


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
शिनोळी ( ता. चंदगड ) येथील यशवंत विकास सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीत  आमदार राजेश पाटील गटाच्या  दुर्गामाता महालक्ष्मी पॅनेलने सर्वच्या सर्व १३ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवले तर विरोधी गटाचा या निवडणूकीत धूव्वा उडाला.
  आमदार राजेश पाटील गटाकडून परशुराम पाटील,  जि. प. सदस्य अरूण सुतार, एस. वाय. पाटील, वामनराव खांडेकर बाळासाहेब पाटील यानी नेतृत्व केले. तर विरोधी गटाकडून मळेकरणी परिवर्तन आघाडीकडून प्रभाकर खांडेकर व प्रताप सुर्यवंशी यानी नेतृत्व केले. एकुण ३२० मतदानापैकी ३०४ मतदान झाले. यामध्ये १९ मते अवैध ठरली.


विजयी उमेदवार असे_
 महिला राखीव -
पाटील गंगूबाई गुंडू , पाटील देवाक्का
 कल्लापा 
अनुसूचित जाती -
कांबळे दादू दुर्गापा

भटक्या विमुक्त जाती -
नाईक दशरथ बाबू

सर्वसाधारण खातेदार कर्जदार गट -

करटे प्रकाश गुंडू,
कोकितकर वाकोबा ल.,
खांडेकर वामनराव  गुंडू
पाटील परशराम लक्ष्मण 
पाटील भावकू परशराम
पाटील सिद्धापा क .
मनोळकर यल्लापा,
मनोळकर भुजंग 

बिनविरोध -
पांडूरंग कृष्णा गडकरी

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम. व्ही. पाटील यांनी काम पाहिले.  विजयानंतर विजयी उमेदवार व समर्थकांनी एकच जल्लोष करत गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला. तर पॅनेल प्रमुख परशुराम पाटील व एस. वाय. पाटील यांनी सर्व सभासदांचे आभार मानले.





No comments:

Post a Comment