चंदगड तालुक्यातील एक भाजी विक्रेता ते आंतरराष्ट्रीय धावपट्टू - किरण पाटील, कोणत्या गावातील हा धावपट्टू.......... - चंदगड लाईव्ह न्युज

20 December 2021

चंदगड तालुक्यातील एक भाजी विक्रेता ते आंतरराष्ट्रीय धावपट्टू - किरण पाटील, कोणत्या गावातील हा धावपट्टू..........

किरण पाटील

राजेंद्र शिवणगेकर- माणगाव / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड सारख्या ग्रामीण भागातील व मूळचा मौजे बसर्गे गावाचा कु. किरण सटूप्पा पाटील तरुण एक वेळच्या जेवणासाठी भाजी विकणारा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये एशियन ट्रक अँड टर्फ फेडरेशन, इंटर नॅशनल आणि श्रीलंका एशियन ट्रक अँड टर्फफ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, दिनांक 17 ते 19 डिसेंबर या कालवधीमध्ये श्रीलंकेतील कोलोंबो येथे घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल पॅरा स्पर्धेत 100 मी आणि 400 मी धावणे स्पर्धेत सिल्वर मेडल यशस्वीरीत्या मिळवले आहे. या त्याच्या यशामध्ये आई आणि वडील त्याचबरोबर कोच व मार्गदर्शक म्हणुन राजेश खरुजकर (माऊली स्पोर्टस असोसिएशन दाटे), श्री. धनवडे, सुहास मोरे आणि नारायण मडके यांचे मोलाचे योगदान आहे.

No comments:

Post a Comment