चेकपोस्टवर अशी वाहनांची तपासणी सुरु आहे. |
निवृत्ती हारकारे /मजरे कार्वे
बाची येथे कर्नाटक प्रशासनाने महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लावले आहेत. rt-pcr टेस्ट असल्याशिवाय कर्नाटकात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे चंदगड तालुक्यातील व्यापारी, शेतकरी व जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
कोरोणा च्या दुसऱ्या लाटेत कर्नाटकातील बाची येथे चेक पोस्ट सुरू करून बेळगाव ला येणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास देण्यात आला. कोरोणा चा प्रादुर्भाव कमी झाल्याने काही काळ ही तपासणी शिथिल करण्यात आली होती. मात्र कोरोणा च्या नव्या ओमिक्रोन नावाच्या व्हेरीएंटने पुन्हा एकदा जगभर थैमान घातले आहे. त्याचा परिणाम म्हणून कर्नाटक प्रशासनाने पुन्हा या पोस्टवरून येणाऱ्यांची तपासणी सुरू केली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण झाले असतानाही कर्नाटकात प्रवेश करणाऱ्यांना rt-pcr टेस्टचे बंधन घातले आहे. त्यामुळे चंदगड तालुक्यातील शेतकरी व्यापारी व जनतेतून जनतेची कुचंबणा होत आहे. महाराष्ट्रातील जनतेला कर्नाटकात प्रवेश नाही. मात्र कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात लोकांची ये-जा राजरोसपणे सुरु आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या रुग्णांची संख्या कर्नाटकातच जास्त आहे. मात्र कर्नाटक च्या लोकांची तपासणी करायचे राहिलेच पण महाराष्ट्रातून कर्नाटकात आलेल्यांची तपासणी सुरू असल्याने येथे संताप व्यक्त केला जात आहे. कर्नाटकातून महाराष्ट्रात आज खुले आम नागरिक फिरताना दिसत आहेत. त्यांना बंधन लावणे गरजेचे आहे. असे येथील व्यापारी शेतकऱ्यांचे मत आहे.चंदगड तालुका हा प्रामुख्याने बेळगाव शी निगडीत आहे. येथील 90 टक्के व्यवहार हे बेळगाव शी संबंधित आहेत. शेतकऱ्यांची सर्व उत्पादने बेळगाव बाजारपेठेत विक्रीसाठी जातात. व्यापाऱ्यांना बेळगाव शिवाय दुसरी बाजारपेठ नाही. चंदगड तालुक्यात एकही मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नाही. त्यामुळे येथील बहुतांश रुग्ण हे बेळगावच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतात. त्यामुळे बेळगाव शी नाते कायम असावे अशी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांची भावना आहे. त्यामुळे बेळगाव प्रशासनाने चंदगडच्या नागरिकांना खुलेआम प्रवेश द्यावा. अशी मागणी येथील जनतेतून होत आहे. तथापि बेळगाव मध्ये महाराष्ट्रातील नागरिकांना प्रवेश नसेल तर कर्नाटकातील एकाही व्यक्तीला महाराष्ट्रात प्रवेश देण्यात येऊ नये. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कोल्हापुरात इतर राज्यातून किंवा जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांनी कोरोणा लसीचे दोन डोस घेतले असले पाहिजेत अथवा लस घेतलेली नसेल तर 72 तासाच्या आतील rt-pcr चाचणी अत्यावश्यक आहे. असे आदेश नुकतेच काढले आहेत. याचीही काटेकोर अंमलबजावणी या शिनोळी सीमा नाक्यावर व्हावी. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
No comments:
Post a Comment