युवासेनेच्या वतीने कोल्हापूर जिल्हयात रक्तदान शिबिर संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

05 December 2021

युवासेनेच्या वतीने कोल्हापूर जिल्हयात रक्तदान शिबिर संपन्न

रक्तदान शिबिर प्रसंगी उपस्थित युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते

नेसरी / सी. एल. वृत्तसेवा

       हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशानुसार  युवासेना कोल्हापूर विस्तारक  डॉ सतीश नरसिंग व युवासेना कोल्हापूर जिल्हा अधिकारी  दिनेश कुंभीरकर यांनी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात  रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

     या निमित्ताने नेसरी युवासेना शाखेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. याप्रसंगी  संग्रामसिंह कुपेकर चंदगड विधानसभा संघटक, प्रकाश दळवी, युवासेना उपजिल्हा समन्वयक प्रतिक क्षिरसागर यांनी भेट दिली तसेच नेसरी पोलीस ठाण्याचे एपीआय अविनाश माने, शिवसेना माजी उपतालुका प्रमुख विलासभाई हल्याळी, नेसरी शिवसेना शहरप्रमुख प्रकाश शिवाजी मुरकुटे, युवासेना उपतालुका अधिकारी हरी भोपळे ,युवासेना तालुका समनवयक शेहजाद वाटगी, युवासेना शहर समनवयक सचिन नाईक, युवासेना शहर अधिकारी अक्षय डवरी, युवासेना उपशहर अधिकारी कैफ दड्डीकर, नेसरी उपशहर प्रमुख दिगंबर तेजम, विठ्ठल घेवडे, किरण हिड्डदुगी, प्रसाद हल्याळी, विजय वडर, जमीर जलाली, प्रमोद मुरकुटे, भागेश पांडव, प्रशांत मुरकुटे, रवी चव्हाण, स्वप्नील नाईक, चिन्मय शिंदे, मंथन देऊसकर, विवेक कांबळे, रोहन रेडेकर, संग्राम पाळेकर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment