चन्नेटी येथे गावठी दारु तयार करणाऱ्या अड्यावर पोलिसांचा छापा, मुद्देमाल जप्त - चंदगड लाईव्ह न्युज

05 December 2021

चन्नेटी येथे गावठी दारु तयार करणाऱ्या अड्यावर पोलिसांचा छापा, मुद्देमाल जप्त

गावठी दारु तयार करण्यासाठी बॅरेलमध्ये भरुन ठेवलेले रसायन ओतून नष्ट करताना पोलिस.


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          चन्नेटी (ता. चंदगड) येथे श्रीकोळ नावचे शेत जमिनीमध्ये गवत व जंगल रानात उघडयावर गावठी हातभट्टीची दारु तयार करताना या ठिकाणी चंदगड पोलिसांनी छापा टाकून ७४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. शनिवारी साडेदहा वाजता पोलिसांनी हि कारवाई केली. या प्रकरणी बसवानी मल्लाप्पा नाईक (रा. चन्नेटी, ता. चंदगड जि. कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

         यासंदर्भात पोलिसांतून मिळालेली माहीती अशी – चन्नेटी येथे हातभट्टीची दारु तयार करत असल्याची माहीती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. शनिवारी साडेदहा वाजता चंदगड पोलिसांच्या टीमने अचानकपणे छापा टाकला. यामध्ये 750/- त्यात गा.ह. भ. ची तयार दारु 5 लिटर आंबट उग्र वासांची एका स्टीलचे कळशीमध्ये मिळून आलेली प्रति लिटर 150 प्रमाणे कि.स., 6200/- रु त्यात प्लॉस्टीक बॅरेल एक 500/- किंमतीचे निळे रंगाचे त्यामध्ये 190 लिटर आंबट उम्र वासाचे रसायन भरलेले प्रति 30 रुपये प्रमाणे व सदरचे रसायन सॅम्पल नमुना घेऊन पंचाचे समच नाश केलेले मि.कि.स., 220/- रु त्यात जर्मनचे डेचके एक 100/- किंमतीचे त्यामध्ये 4 लिटर उकळते आंबट उग्र वासाचे रसायन भरलेले प्रति लिटर 30 प्रमाणे व सदरचे रसायन सॅम्पल नमुना घेऊन पंचाचे समच नाश केलेले मि.कि.स., 80 /-रु त्यात जर्मनचे डेचके त्यास वरील बाजुस गोलाकार छिद्र असलेले मि.कि.स., 50/- एक भगव्या रंगाची रबरी पाईप मि.कि.स., 100 /- एक रबरी टायरची इन्नर मि.कि.स. असा एकूण ७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याचबरोबर कच्चे रसायनचे बँरेल फोडून नष्ट केले. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून पोलिस नाईक राज किल्लेदार तपास करत आहेत. 

No comments:

Post a Comment