खास.शरद पवार यांच्या वाढदिनी 'राष्ट्रवादी परिसंवाद अभियाना'चे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

11 December 2021

खास.शरद पवार यांच्या वाढदिनी 'राष्ट्रवादी परिसंवाद अभियाना'चे आयोजन

शरद पवार

चंदगड /प्रतिनिधी
 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा डिसेंबर १२ ला ८१व्या  वाढदिवसानिमित्त 'राष्ट्रवादी परिसंवाद अभियान' घेतले जाणार आहे. या दरम्यान शिनोळी येथे व्याख्यान व व्हर्च्यूल रॅलिचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारची रोजची वाढती बेसुमार महागाई, शेतकरी कायदे, केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर व राज्यात जाणीपूर्वक सातत्याने जातीय तेढ निर्माण करण्याबाबत होणारे प्रयत्न या विषयांवर प्रा. शिवाजीराव भुकेले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे. तसेच शरद पवार यांचे विचार तळागाळात पोहचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
 यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वर्च्यूल रॅली काढून शरद पवार यांचे अभिष्टचिंतन करणार आहेत. तरी चंदगड तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पवार यांना वाढदिवसाचे अभिष्टचिंतन वाहण्यासाठी शिनोळी येथे सकाळी ९ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार राजेश पाटील यानी केले आहे. 

No comments:

Post a Comment