एस. टी. संपात सहभागी न झाल्याने वाहतुक नियत्रंकास माराहाण, चंदगड आगारातील प्रकार - चंदगड लाईव्ह न्युज

11 December 2021

एस. टी. संपात सहभागी न झाल्याने वाहतुक नियत्रंकास माराहाण, चंदगड आगारातील प्रकार


चंदगड/प्रतिनिधी
एस. टी. कर्मचाऱ्यांच्या सूरू असलेल्या संपात सहभागी न झाल्याच्या रागापोटी वहातूक नियंत्रक सचिन रामराव मुंढे (वय. 38, रा. मु. पो. गंगाखेड ता. गंगाखेड जि. परभणी, सध्या रा विनायक नगर चंदगड) याना तिघा कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली.ए.डी.मोराळे ,एस.टी.नागरगोजे, गोविंद.व्ही.दराडे (तिघेजण रा.चंदगड) अशी माराहाण केलेल्या तिघा कर्मचाऱ्यांची नावे आहेत. 
  सध्या महिनाभरापासून एस टी कर्मचाऱ्यांचा पगारवाढ, व एस टी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे. या मागणीसाठी संप सूरू आहे, या संपात वहातूक नियत्रंक सचिन मुंढे हे सहभागी न होता कामावर हजर राहून कार्य बजावत आहेत. काल दुपारी ते जेवण करण्यासाठी घरी जात असताना वाटेत ए. डी.मोराळे ,एस.टी.नागरगोजे, गोविंद.व्ही.दराडे  या तिघांनी दारु पिवुन श्री.मुंढे याना   तु काय डेपो मॅनेजर आहेस का तुझ्या मुळेच एस.टी. बसेस डेपोच्या बाहेर निघत आहेत. संप चालु असताना एस . टी . डेपोच्या बाहेर काढायचा तुझा काय अधिकार आहे. असे म्हणुन  लाथाबुक्यांनी छातीवर , तोंडावर , पोटावर , मानेवर मारहाण करुन गंभीर जखमी केले.या बाबतीतची  फिर्याद सचिन मुंढे यानी चंदगड पोलिसात दिली असून आरोपींवर कलम ३६२/२०२१भा.द.वि.स.कलम ३५३ ,३३२ , ३२३,५०६ , ३४ सह महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ८५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जमादार करत आहेत. 

No comments:

Post a Comment