ब्रेकींग न्युज - पारगड किल्यावर बिबट्याचा वावर, ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण, वनविभागाने बंदोबस्त ठेवण्याची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

12 December 2021

ब्रेकींग न्युज - पारगड किल्यावर बिबट्याचा वावर, ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण, वनविभागाने बंदोबस्त ठेवण्याची मागणी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       किल्ले पारगड (ता. चंदगड) गावानजीक घोडे खिंड परिसरात रस्त्यालगत झुडपाात लपलेला बिबट्या ग्रामसेवक तांबडे व ग्रामपंचायत कर्मचारी संजय कांबळे यांच्या निदर्शनास आला. त्यामुळे गडावर जाणारे पर्यटक व गडावरील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने या ठिकाणी बंदोबस्त ठेवावा अशी मागणी पारगड येथील ग्रामस्थांकडून होत आहे. 

             काल ग्रामसेवक तांबडे हे कर्मचारी संजय कांबळे यांच्यासह पारगड येथे कार्यालयात कामकाजासाठी दुचाकीवरून जात होते. पारगड वर जाण्यासाठी दक्षिणेकडील  बाजूस असलेल्या घोडे खिंड या चढतीला असलेल्या झुडपाात बिबट्या बसलेला ग्रामसेवक तांबडे यांना दिसला. लागलीच तांबडे यानी गाडी परतावून घेऊन माघारी फिरले. व पायथ्याशी आले.

      या ठिकाणी दुचाकी लावून ते पायवाटेने पायर्‍या चढून गडावर गेले. यावेळी वन व्यवस्थापन समितीचे सचिव रघुवीर शेलार, प्रकाश चिरमुरे, गोविंद कांबळे यांना बिबट्याची माहीती दिली. सर्वानी घोडे खिंडी जवळ पाहिले असता तेथे बिबट्याच्या पायाचे ठसे व विष्टा आढळून आली. त्यामुळे येथे बिबट्याचा वावर अधोरेखित झाला आहे. बिबट्याचा वावर असलेल्या क्षेत्रावर वनविभाग लक्ष ठेवून असला तरी नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment