गांजा बाळगल्याप्रकरणी शिरगाव येथील युवकाला अटक - चंदगड लाईव्ह न्युज

17 December 2021

गांजा बाळगल्याप्रकरणी शिरगाव येथील युवकाला अटक

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          गांजा (अमली पदार्थ) बाळगल्याप्रकरणी चंदगड पोलिसांनी आरोपी मनोज मारुती कुंदेकर (वय २०, रा. मजरे शिरगाव, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) याला अटक केली असून त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पो. कॉ. संदीप मधुकर कांबळे यांनी फिर्याद दिली असून आरोपीकडून चंदगड फाटा येथून २ हजार २१० रुपये किंमतीचा ३४ ग्रॅम इतक्या वजनाचा सिलंबद केलेला अंमली पदार्थ (गांजा) जप्त केला आहे. 

       यासंदर्भात पोलिसांतुन मिळालेली माहिती अशी की, आरोपी मनोज मारुती कुंदेकर हा त्यांचे कब्जात बिगरपरवाना बेकायदा अंदाजे २ हजार २१०रू. किमतीचा मुद्देमाल त्यात निव्वळ ३४ ग्रॅम वजनाचा गांजासदृश अंमली पदार्थ बाळगलेल्या अवस्थेत चंदगड फाटा येथे मिळून आला. त्याच्याविरुध्द अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक बी. ए. तळेकर करत आहेत.

No comments:

Post a Comment