चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात पालक मेळावा उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

10 January 2022

चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात पालक मेळावा उत्साहात

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          आजच्या वेगवान व अनिश्चित बदलाच्या प्रवाहात विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित करणेसाठी इतर घटकाबरोबर पालकांचा सहभाग अत्यावश्यक बनला आहे. सध्याचा काळ हा ज्ञानाचे शतक मानला जातो. जगाची शक्ती ज्ञानाकडे झुकते आहे. त्यामुळे अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत प्रभावी समन्वय साधून ती सक्षम बनविण्यासाठी पालक वर्गाचे माठे योगदान अपेक्षित आहे. तरच पाल्यांच्या सुप्त क्षमतेला चालना मिळते आणि सर्वकंश विकास होतो असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी व्यक्त केले. ते र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विभागामार्फत आयोजीत पालक मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.             ते पुढे म्हणाले विद्यार्थी - पालकांच्या नवकल्पनाचे स्वागत आणि विविध सुचनांचे पालण करून महाविद्यालयाची निरंतर गुणवता वाढविण्याचा आमचा मानस असल्याचे सांगुन विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी महाविद्यालय नेहमी प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले. प्रारंभी वाणिज्य व व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. एस. डी. गोरल यांनी प्रास्ताविक करून पालक स्नेह मेळाव्याचा उध्देश व महत्व विशद केले. विशेषतः पालकांनी आपल्या कौंटूबिंक व्यवहाराची जबाबदारी टप्या टप्याने पाल्यांच्यावर सोपविल्यास त्यांना आवश्यक ती पारंपारीक कौशल्य आत्मसात करता येतील. त्यातून त्याना अत्मनिर्भर बनने शक्य होईल असे सुचविण्यात आले. पालकांतर्फे सिताराम लक्ष्मण चव्हाण, रवळनाथ बाबू यादव, ज्योती अनंत हिरेमठ, मधुकर गोपाळ तेजम, सुरेश नागोजी पेडणेकर, मारूती शंकर माडखोलकर, अदिती सतिश वणकुंद्रे यांनी चर्चेत सहभाग घेतला. महाविद्यालयाने कॅम्पस इंटरव्हयू आणि रोजगाराच्या संधीकडे अधिक प्रयत्न करावेत अशी मागणी करण्यात आली. विषय शिक्षकांनी अध्यापनाच्या दृष्टीने विचार मांडले. यावेळी डॉ. आर. एन.  सांळूखे, प्रा. टी. एम. पाटील, प्रा. आर. एस. पाटील यांच्यासह एकूण ६५ पालक उपस्थित होते. प्रा. ए. डी. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एस. एन. पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment